शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बोगस खत विक्री प्रकरणी कारवाई करा, अधिकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी आणला नोटांचा हार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 19:07 IST

क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोटांचा हार आणत केले आंदोलन

हिंगोली : बोगस खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरुपी निलंबित करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने २० जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. यंदा शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नाही. जेथे मिळते तेथे अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करावे लागत आहे. हिंगोली शहरात गोदावरी कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी १९ जून रोजी छापा टाकला. यामध्ये डीएपी खत बनावट असल्याच्या संशय आल्याने अधिकाऱ्यांनी संबंधित गोदामाला सील ठोकले आहे. तसेच यात गुन्हाही नोंद झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात शुक्रवारी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बोगस खत विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरुपी निलंबित करावा, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, किसान भारती निर्माण फर्टीलायझर या नावाने बोबस एसएसपी खताची विक्री होत आहे. यावर तत्काळ नमूने घेऊन कार्यवाही करावी, इ-पॉस मशीनद्वारे खताची विक्री न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रविण मते, रामेश्वर कावरखे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी कृषी विभाग तसेच विक्रेत्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. संतप्त पदाधिकाऱ्यांनी नोटांचा हार तयार करून आणला होता.

आश्वासनानंतर आंदोलन मागेदरम्यान, क्रातीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात नोटांचा हार घालण्याची भूमिका घेतली हेाती. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाण मांडले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीagitationआंदोलन