शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाला बसतोय, पण मनच लागत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST

हिंगोली: अभ्यासाला बसतोय, परंतु अभ्यासात मनच लागत नाही, अशा तक्रारी किशोरवयीन मुलांच्या असून, २०१९-२० या वर्षात हा आरोग्यविषयक तक्रारींचा ...

हिंगोली: अभ्यासाला बसतोय, परंतु अभ्यासात मनच लागत नाही, अशा तक्रारी किशोरवयीन मुलांच्या असून, २०१९-२० या वर्षात हा आरोग्यविषयक तक्रारींचा (समस्या) आकडा ९ हजार ६०० वर पोहोचलेला पहायला मिळत आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात २०१४ या वर्षापासून काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो असून त्यात हिंगोली जिल्ह्यााचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी ९ हजार ६०० तक्रारी या आरोग्यविषयक होत्या. यामध्ये १० ते १९ वयोगटातील मुला-मुलींचा समावेश होता. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत ३ हजार ८४० मुलांच्या तर ५ हजार ७६० या मुलींच्या तक्रारी आल्या होत्या. आलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी १६ समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये ज्या मुला-मुलींनी तक्रारी केल्या आहेत त्यांच्या तक्रारी जाणून त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन करत त्यावर मार्ग काढून दिला जातो. लॉकडाऊन काळात या तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मार्च २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. एप्रिल ते जुलै दरम्यान हा कार्यक्रम बंद होता. शाळा-महाविद्यालयांनाही सुटी होती. त्यानंतर शहरातील नागरी आरोग्य केंद्रात तसेच अंगणवाडी अंतर्गत आलेल्या तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लॉकडाऊन काळात जवळपास २५ ते ३० कार्यक्रम या कार्यक्रमातंर्गत घेण्यात आले.

२०२० मध्ये आलेल्या तक्रारींची संख्या-९६००

३८४० मुुलांच्या तक्रारी

५७६० मुलींच्या तक्रारी

मोबाईलशिवाय करमत नाही...

मोबाईलशिवाय करमत नाही, काय करू अभ्यासात मन लागत नाही, डोके दुखते, पोट दुखते अशा एक ना अनेक समस्या मुला-मुलींच्या असतात. बहुतांश वेळा मुले-मुली दिवस-दिवस मोबाईलवर असतात. यामुळे मोबाईलचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो. कधी-कधी डोकेही जड पडते. काही सुचत नाही. तेव्हा पालकांनी मुला-मुलींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

बॉक्स

आरोग्य विषयक असतात तक्रारी

राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यकमात जास्त करुन आरोग्य विषयकच तक्रारी जास्त आलेल्या होत्या. अशावेळी मुले-मुलींची तक्रार जाणून घेऊन त्यांना योग्य प्रकारे समुपदेशन केले आहे. जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये मुला-मुलींना समुपदेशन केले आहे. किशोरवयीन मुला-मुलींसमवेत पालकांनाही समुपदेशन करण्यात आलेले आहे.

बॉक्स

लाॅकडाऊन नंतर...

मार्च महिन्यात कोरोना आजाराने डोके वर काढले होते. त्यानंतर एप्रिल ते जुलै या दरम्यान सर्वत्र व्यवहार बंद होते. बाहेर पडणेही मुश्कील होऊन बसले होते. यानंतर अनेक मुले-मुलींच्या तक्रारी आल्या. प्रत्येकाच्या घरी जाणे तर शक्य नसते. म्हणून आम्ही शहरातील नागरी आरोग्य केंद्रात या सर्वांच्या तक्रारींचे निरसन करुन योग्य प्रकारे समुपदेशन केले, अशी माहिती जिल्हा समन्वयक अनुराधा पतरोड यांनी दिली.