ढोल-ताशांच्या गजरात संदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:47 IST2019-09-21T23:44:40+5:302019-09-21T23:47:06+5:30

येथील प्रसिद्ध दर्गाह नुरीबाबा यांच्या उरुसानिमित्त २१ सप्टेंबर रोजी रजा मैदान येथून ढोल ताशांच्या गजरात संदलची मिरवणूक काढली.

 Sandal in the drum-card alarm | ढोल-ताशांच्या गजरात संदल

ढोल-ताशांच्या गजरात संदल

लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी: येथील प्रसिद्ध दर्गाह नुरीबाबा यांच्या उरुसानिमित्त २१ सप्टेंबर रोजी रजा मैदान येथून ढोल ताशांच्या गजरात संदलची मिरवणूक काढली.
दर्गाहचे नायब मुतवल्ली खुदरतुल्ला हुसेनी यांच्या हस्ते उंटावर संदल चढविण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात शहरातील मिरवणूक मार्गाने संदलची मिरवणूक काढण्यात आली. ती रात्री उशिरा दर्गाहवर पोहोचली. हजारो नुरी भक्तांच्या उपस्थितीत मजार शरीफवर संदल चढविण्यात आला व सामूहिक प्रार्थना करण्यात आली. शहरातील नागरिकांच्या वतीने मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. संदल मिरवणुकीत मराठवाडा व विदर्भातील जवळपास ४० नामवंत ढोलताशे सहभागी झाले होते. नागरिकांनी पाण्याचेही वाटप केले. उरुसानिमित्त शहरात ७ ते ८ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल असते.

Web Title:  Sandal in the drum-card alarm