शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर हातात रुमणे घेऊ; रास्तारोको आंदोलनात कॉंग्रेसचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:15 IST

हिंगोलीत मुख्य मार्गावर अर्धातास वाहतूक ठप्प

हिंगोली : राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांसाठी काँग्रसतर्फे ६ नोव्हेंबर रोजी जिल्हाभरातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. हिंगोली येथील अकोला-बायपास येथे रास्तारोको करण्यात आले.

परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. परंतु अद्याप शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये आर्थिक मदत त्वरीत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी रस्तारोको करण्यात आला. मुख्य मार्गावर रस्तारोकोमुळे जवळपास अर्धातास वाहतुक ठप्प होती. वाहनांच्या रस्त्यावर लांबलचक रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच अग्निशामक दल व रूग्णवाहिका आंदोलनस्थळी उभ्या दिसून आल्या. हिंगोली ग्रामीणचे पोनि अंगद सुडके तसेच अधिकारी कर्मचारी हजर होते.

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर उभे नाही...अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे नाही. काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. परंतु परतीच्या पावसाने बळीराजा हतबल झाला तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच आंदोलन करण्यात आले आहे. यापुढेही शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास हातात रूमणे घेऊन काँग्रेस आंदोलन उतरेल असा इशारा आ. भाऊराव पाटील यांनी दिला.

आंदोलनात माजी आ. भाऊराव पाटील गोरेगांवकर, शामराव जगताप, मिलींद उबाळे, गणेश थोरात, रामेश्वर लिंबाळे, बी. टी. कावरखे, रूपाजी कºहाळे, एकनाथ शिंदे, बाजीराव जवळेकर, बालाजी गावंडे, शिवप्रसाद जगताप, रंगनाथ घोंगडे, निरज देशमुख, सुमित चौधरी, जहिरभाई इटवाले, विशाल इंगोले, पवन उपाध्याय यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसHingoliहिंगोलीagitationआंदोलनFarmerशेतकरी