शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत जाताय मोबाइल सांभाळा; महिन्यात दहा तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली : शहरातील गांधी चौक बाजार, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक परिसरात जाताय तर आपला मोबाइल सांभाळून ठेवा, अशी ...

हिंगोली : शहरातील गांधी चौक बाजार, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक परिसरात जाताय तर आपला मोबाइल सांभाळून ठेवा, अशी सांगण्याची वेळ आली आहे. शहरातील या भागात नागरिकांचे मोबाइल चोरीला, हरवल्याच्या तक्रारी आहेत.

मोबाइल प्रत्येकाकडे आला असून, अत्यावश्यक वस्तू बनली आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांची कुंडली मोबाइलमध्ये जतन करून ठेवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महागडा मोबाइल वापरण्याची क्रेझ तयार झाली आहे. त्यामुळे मोबाइल चोरणाऱ्यांची टोळीही सक्रिय झाली असून, दररोज मोबाइल चोरीच्या अथवा गहाळ होण्याच्या घटना घडत आहेत. हिंगोली शहरातील गांधी चौक, जवाहर रोड, भाजी मंडई, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मोंढा परिसरात मोबाइ गहाळ होण्याच्या घटना घडल्या आहेत. २०२० मध्ये शहरातील विविध भागातून ७१ नागरिकांनी आपले मोबाइल हरवले आहेत तर २०२१ मध्ये जूनपर्यंत ५७ जणांनी आपले मोबाइल गहाळ केले आहेत. गहाळ झालेले मोबाइल सहसा सापडतीलच याची शाश्वती नसते.

मोबाइल चोरी झाल्यास प्रथम हे करा...

मोबाइल चोरी झाल्यास प्रथम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा, मोबाइल सीमकार्ड ब्लॉक करण्यासाठी कंपनीच्या नंबरवर कळवा. चोरीला गेलेला मोबाइल पासवर्ड ऑनलाइनद्वारे बदला. पंधरा अंकी आयएमएआय नंबर माहिती असल्यास तो प्रथम पोलीस ठाण्यात कळवा. एफआयआर नोंदविल्यानंतर तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाइलवरून काही चूक झाल्यास त्यासाठी तुम्हाला जबाबदार धरले जात नाही.

सहा महिन्यात २० मोबाइल शोधण्यात यश

चोरीला अथवा गहाळ झालेला मोबाइल सापडणे कठीणच आहे. सायबर सेलच्या मदतीने आयएमएआय नंबर ट्रेस झाल्यास मोबाइल सापडण्याची शक्यता असते. मात्र अनेक महिने मोबाइल ट्रेस होण्यास वेळ लागतो. तरीही हिंगोली शहर पोलिसांनी जून महिन्यात एका चोरट्यांकडून २० मोबाइल जप्त केले असून, त्यातील काही मोबाइल मूळमालकांना परतही केले आहेत.

मागील महिन्यातच एका मोबाइल चोरट्याचा शोध घेऊन त्याच्याकडून २० मोबाइल जप्त केले आहेत. यातील काही मोबाइल मूळमालकांना परतही केले. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी आपला मोबाइल जपून ठेवणे महत्त्वाचे आहे.

- पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, हिंगोली शहर

या ठिकाणी सांभाळा मोबाइल

गांधी चौक बाजार

गांधी चौक बाजार भागात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते. गर्दीचा फायदा घेऊन काही चोरटे मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी या भागातून दोन मोबाइल चोरीला गेले आहेत.

जवाहर रोड

शहरातील जवाहर रोड भागातून वाहनांची वर्दळ असते. या भागातून मागील वर्षी दोन मोबाइल चोरीला गेले असल्याची नोंद शहर पोलीस ठाण्यात आहे.

रेल्वे स्टेशन

हिंगोली येथील रेल्वे स्टेशन नियमित गजबजलेले राहत नसले तरी रेल्वे आल्यानंतर प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळे मोबाइल गहाळ होण्याची शक्यता जास्त आहे.

बसस्थानक

येथील बसस्थानक भागातूनही प्रवाशांचे मोबाइल गहाळ झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या ठिकाणी आपला मोबाइल जपून ठेवणे गरजेचे आहे.

मोबाइल गहाळ, चोरीला गेल्याच्या तक्रारी

वर्ष, महिना गहाळ चोरीला गेले

२०२० ७१ ०४

२०२१ जानेवारी ०६ ००

फेब्रुवारी ०८ ००

मार्च ०४ ००

एप्रिल ११ ००

मे १४ ०१

जून १४ ००

जुलै ०२ ००