शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत मोटार पंप चोरट्यांना पकडले; १२ गुन्हे उघड

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: December 13, 2023 17:20 IST

चोरट्यांकडून १.८४ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

हिंगोली : शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर, कालव्यावर बसवलेल्या विद्युत मोटार, स्टार्टरची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्यांनी १२ ठिकाणी गुन्हे केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी १ लाख ८४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पिकांना पाणी देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी कालवा, विहिरीवर विद्युत मोटार पंप बसविले आहेत. पिकांना पाणी देण्याच्या ऐन वेळी विद्युत पंप चोरीला जाण्याच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्या होत्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते.

दरम्यान, औंढा ना. तालुक्यातील असोला शिवारातील विद्युत मोटारी देवबा पांडुरंग घुगे व अभिजित संतोष बांगर (दोघे रा. असोला) यांनी चोरी केल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच हट्टा पोलिस ठाणे हद्दीतील ७, बासंबा १, सेनगाव १, कुरूंदा, १, वसमत ग्रा. १ तसेच वसमत शहर पोलिस ठाणे हद्दीत एका ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली.

१२ गुन्हे उघडकीसयावेळी त्यांच्याकडून १२ गुन्हे उघड झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून ५ विद्युत मोटारीसह मोटार पंप तोडून विक्री करून मिळालेले ५४ हजार ५०० रूपये व एक दुचाकी असा एकूण १ लाख ८४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, विठ्ठल कोळेकर, ज्ञानेश्वर सावळे, तुषार ठाकरे, इरफान पठाण, दिपक पाटील, दत्ता नागरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली