करंजी परिसरात कोळपणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:35+5:302021-07-07T04:36:35+5:30

करंजी : वसमत तालुक्यातील करंजी व परिसरात पिकांची उगवण चांगली झाल्यामुळे शेतकरी कोळपणी कामात व्यस्त दिसून येत आहेत. ...

The digging started in Karanji area | करंजी परिसरात कोळपणीला सुरुवात

करंजी परिसरात कोळपणीला सुरुवात

करंजी : वसमत तालुक्यातील करंजी व परिसरात पिकांची उगवण चांगली झाल्यामुळे शेतकरी कोळपणी कामात व्यस्त दिसून येत आहेत. मृग नक्षत्राच्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, कापूस, मूग आदी पिकांची पेरणी केली आहे. सद्य:स्थितीत पिके उगवली असली असून, शेतकरी कोळपणीला लागला आहे. गत काही महिन्यांपासून महागाईने कळस गाठला आहे. कोळपणीसाठी शेतकऱ्यांना बैलही मिळेना झाले आहेत. दुसरीकडे जास्तीचे पैसे देऊनही मजूर शेतीकामाला येत नाहीत. त्यामुळे शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडला आहे. येत्या दोन-चार दिवसांत पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्यायही राहणार नाही. आजमितीस तरी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत दिसून येत आहे.

दारेफळ गावात मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी स्वत:च पिकामध्ये कोळपणी करत आहे.

फोटो १६

Web Title: The digging started in Karanji area