coronavirus : सुखद ! हिंगोलीत १८ एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 19:29 IST2020-05-12T19:27:35+5:302020-05-12T19:29:35+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयातून सोडण्यात १८ जवानांना सुटी

coronavirus: pleasant! 18 CRPF jawans corona free, released in Hingoli | coronavirus : सुखद ! हिंगोलीत १८ एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त

coronavirus : सुखद ! हिंगोलीत १८ एसआरपीएफ जवान कोरोनामुक्त

हिंगोली: कोरोनाबाधित बरे होवून जाणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज पुन्हा १८ जवानांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आता शहरात ५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत ९१ जण दाखल झाले होते. यापूर्वी २0 जणांना सोडण्यात आले. आज पुन्हा १८ जवानांना डिस्चार्ज दिला आहे. या रुग्णांना घरी सोडण्यासाठी जिल्हा समादेशक मंचक इप्पर, डॉ.गोपाल कमद, डॉ.दीपक मोरे यांच्यासह सर्व परिचारिकांची उपस्थिती होती. या जवानांनी काय काळजी घ्यावी, याची माहिती देण्यात आली. तर या जवानांना ड्रायफ्रुट व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Web Title: coronavirus: pleasant! 18 CRPF jawans corona free, released in Hingoli