Coronavirus : हिंगोलीत कृषीची दुकाने रोज सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 08:35 PM2020-05-07T20:35:54+5:302020-05-07T20:38:31+5:30

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

Coronavirus: Agricultural shops in Hingoli will continue daily | Coronavirus : हिंगोलीत कृषीची दुकाने रोज सुरू राहणार

Coronavirus : हिंगोलीत कृषीची दुकाने रोज सुरू राहणार

Next

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या टाळेबंदीतून कृषीच्या दुकानांना शिथिलता दिली असून कृषी केंद्र रोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तसे आदेश काढले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरिपाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना खते, बी-बियाणे यांचा साठा करण्यासह शेतकऱ्यांनाही खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी ही तजविज केली. ठिबक, तुषार, पाईप पुरवठा, कृषी यंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे सुटे भाग व दुरुस्तीची दुकाने सुरळीत असणे आवश्यक असल्याचे आदेशात म्हटले. तर परवानाधारक कृषी केंद्र रोज ९ ते ५ या वेळेत चालू ठेवता येणार आहे. 

यासाठी दुकान पूर्णपणे सॅनिटाईज करून सुरुवात करावी, कामावरील कामगार, खरेदीदाारचे नाव, संपर्काचा पत्ता, मोबाईल क्रमांक नोंदवणे, दुकानदार व कामगारांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सामाजिक अंतराचा नियम ग्राहक व दुकानदारांनी पाळावा, सॅनिटायझर ठेवावे, दुकानांसमोर ग्राहकांसाठी गोल आखणी करावी, कामगारांची थर्मल गनच्या साह्याने तपासणी करावी, दुकानदारांनीच कामगारांना मास्क व सॅनिटायझर द्यावे, दुकानाच्या परिसरात पिण्याचे पाणीव हात धुण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य ठिकाणी करावी, पाणी उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी आदी अटी घालण्यात आल्या आहेत. त्याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

Web Title: Coronavirus: Agricultural shops in Hingoli will continue daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.