शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना राेवताे पुन्हा पाय नव्याने ७० रुग्ण आढळले; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून, २१ मार्च रोजी पुन्हा नव्याने ७० रुग्ण आढळून ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसून, २१ मार्च रोजी पुन्हा नव्याने ७० रुग्ण आढळून आले, तर सलग तिसऱ्या दिवशी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृताचा आकडा ७४ वर पोहोचला आहे. तसेच रविवारी ५२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी साेडण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेदिवस वाढतचं आहे. दररोज नवीन रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जात असल्या तरी, नागरिकही बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. २० मार्च रोजी तब्बल ११३ रुग्ण, २१ मार्च रोजीही ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. रॅपिड ॲन्टिजन चाचणीत १२७ पैकी १३ रुग्ण आढळून आले आहेत.

हिंगोली परिसरात १०१ पैकी १२ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये पेन्शनपुरा १, शिवाजीनगर १, सामान्य रुग्णालय वसाहत २, आडगाव १, आजेनगर ३, संत नामदेवनगर १, खानापूर १, सेनगाव १ यांचा समावेश आहे. तसेच कळमनुरी परिसरात तीन पैकी येहळेगाव गवळी येथे एक रुग्ण आढळून आला. सेनगाव परिसरात २३ जणांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी केली असता एकही रुग्ण आढळला नाही. तसेच आरटीपीसीआर चाचणी घेतली असता हिंगोली परिसरात २४ रुग्ण आढळून आले आहेत. यात मंगळवारा १, रामाकृष्णानगर ३, तिरूपतीनगर १, रिसाला बाजार ३, हिंगोली १, आदर्श कॉलनी १, जांभरून जहागीर १, हेमराज गल्ली २, श्रभनगर २, सरकळी १, आझम कॉलनी १, महावीरनगर १, हनवतखेडा १, उमरदाती १, माळहिवरा १, सरस्वतीनगर १, ग्रामीण पोलीस ठाणेजवळ १, लोहरा १ यांचा समावेश आहे. सेनगाव परिसरात १४ रुग्ण आढळले. यात भानखेडा २, मकोडी ४, सेनगाव ३, सापटगाव २, कोळसा १, केलसुरा १, कारेगाव १ यांचा समावेश आहे. वसमत परिसरात पाच रुग्ण आढळले असून, यात बुधवार पेठ १, मुजफर शहा मोहल्ला १, सतिपांगरा १, आसेगाव १, वसमत १ यांचा समावेश आहे. कळमनुरी परिसरात १४ रुग्ण आढळले असून, यात नेरवाडी १, कान्हेगाव १, हदगाव २, आखाडा बाळापूर १, दौंडा १, कळमनुरी ४, नागपूर १, सोडेगाव ३ रुग्णांचा समावेश आहे. रविवारी बरे झालेल्या ५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातून २२, लिंबाळा २१, कळमनुरी ६, औंढा येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

बाळापूर येथील एकाचा मृत्यू

कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आखाडा बाळापूर येथील ६० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंत एकूण मृताचा आकडा ७४वर पोहोचला आहे. दरम्यान, आजपर्यंत एकूण ५ हजार २९८ रुग्ण झाले असून, यापैकी ४ हजार ७३० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आजघडीला ४९४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तसेच सहा रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.