कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:31 IST2021-07-28T04:31:10+5:302021-07-28T04:31:10+5:30

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ६६, औंढा ५६, वसमत १२८, कळमनुरी ११५ तर सेनगावात ११ चाचण्या करूनही कोणी बाधित आढळले ...

Corona found three new patients | कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले

कोरोनाचे तीन नवे रुग्ण आढळले

जिल्ह्यात अँटिजन चाचणीत हिंगोली ६६, औंढा ५६, वसमत १२८, कळमनुरी ११५ तर सेनगावात ११ चाचण्या करूनही कोणी बाधित आढळले नाही. आरटीपीसीआर चाचणीत सेनगावातील ८३ पैकी कवरदरी येथील ३ जण बाधित आढळले. तर हिंगोलीत ७६, औंढा ५३, वसमत २३, कळमनुरी १२३ जणांची चाचणी करूनही कोणी बाधित आढळले नाही. आज जिल्हा रुग्णालयातून एकास डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत कोरोनाचे एकूण १५ हजार ९९१ रुग्ण आढळून आले. यापैकी १५ हजार ५८३ जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर ३८७ जणांचा मृत्यू झाला. २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजनवर असून २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने बायपाॅपवर ठेवले आहे.

Web Title: Corona found three new patients