शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईचा बडगा उगारताच तक्रारदारांची घेतली जातेय दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST

हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. पोलीस ठाणे अंमलदाराच्या कामाची वेळ संपत ...

हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागत होते. पोलीस ठाणे अंमलदाराच्या कामाची वेळ संपत आली असताना एखादा नागरिक गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यास अशा वेळी दुसरा ठाणे अंमलदार येईपर्यंत वाट पाहावी लागत होती. यात नागरिकांना नाहक ताटकळत थांबावे लागत होते. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात येताच पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी कारवाईचा बडगा उगारला. नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण तत्काळ करता यावे, म्हणून पोलीस ठाण्याच्या दर्शनीय भागात सूचनाही डकविली. तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. पोलीस निरीक्षक कच्छवे यांनी कारवाईचा बडगा उगारताच पोलीस ठाणे अंमलदार कामाला लागले. गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे. तसेच किरकोळ घरगुती वाद असल्यास अशा नागरिकांचे समुपदेशन ही केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

पती-पत्नीमधील वाद समुपदेशनाने मिटविला

हिंगोली शहर पोलीस ठाण्यात ५ जुलै रोजी दुपारी एक जोडपे एकमेकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. त्यांच्यातील वादही किरकोळ होता. पोलीस ठाणे अंमलदारांनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पती-पत्नीमधील वाद हा किरकोळ कारणावरून झाल्याचे लक्षात येताच ठाणे अंमलदारांनी दोघांचेही समुपदेशन केले. दोघांनाही ठाणे अंमलदाराचे म्हणणे पटल्याने गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले जोडपे आनंदाने घरी परतले.