शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आता महिनाभर दाढी-कटिंग घरातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:30 IST

हिंगोली जिल्ह्यात सलूनची जवळपास हजारांवर दुकाने आहेत. यात प्रत्येकी तीन धरले तरीही जवळपास तीन हजार कारागीर आहेत. खेडोपाडीही बलुतेदारीत ...

हिंगोली जिल्ह्यात सलूनची जवळपास हजारांवर दुकाने आहेत. यात प्रत्येकी तीन धरले तरीही जवळपास तीन हजार कारागीर आहेत. खेडोपाडीही बलुतेदारीत अथवा सरळ घरोघर जाऊन व्यवसाय करणारेही वेगळे आहेत. सलून बंद म्हटले की, सर्वच ठिकाणच्या व्यवसायावर परिणाम होतो. ज्यांची दुकाने भाड्याची आहेत, आई, वडील, मुले, असे मोठे कुटुंब आहे, अशांवर उपासमार ओढवत आहे. शिक्षणाचा खर्च, वैद्यकीय खर्च हे तर करणेच अवघड झाले. यापूर्वीही सात ते आठ महिने व्यवसाय ठप्प होता. आता पुन्हा तेच नशिबी आल्याने अनेकांना गावाकडे शेतात जाऊन राबण्याची वेळ येत आहे. अनेक दिवसांपासून हे काम करीत नसल्याने आता यातही फारशी मजुरी कोणी देत नाही, तर गुत्ते पद्धतीने कामे घेण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचेही काहींनी सांगितले, तर काही जण आता मोंढ्यात जाऊन हमालीच करावी की काय? असा सवाल करीत आहेत.

हिंगोलीत एकूण केशकर्तनालये १५०

त्यावर अवलंबून कामगार ४५०

एकतर आमच्याकडे सॅनिटायझर, साबणाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, दुसरे म्हणजे आतापर्यंत सलूनमध्ये गेल्यावर बाधित झाल्याचे कुणी म्हटले नाही. आमच्या ९० टक्के समाजाची उपजीविका कर्तनालयावरच आहे. तरीही शासन कुठलीच मदत देत नाही. वारंवार आमच्याच मुळावर का उठताहेत, हे कळायला मार्ग नाही.

-अशोक गुळगुळे, जिल्हाध्यक्ष, नाभिक महामंडळ

यापूर्वीही आमची दुकाने आठ ते दहा महिने बंद होती. आता कसाबसा कारभार रुळावर येत होता, तर पुन्हा नव्याने संकट आले. दुकान भाडे, शिक्षण, वैद्यकीय खर्च कसा करावा. घरसंसार कसा चालवायचा? एकतर परवानगी द्या; अन्यथा आम्हाला मदत जाहीर करा.

-गजानन मोरे, युवा जिल्हाध्यक्ष, नाभिक महामंडळ

यापूर्वीच्या टाळेबंदीत दुकान भाडे न भरल्याने दुकान हातचे गेले. आता नवीन दुकान सुरू करण्याचा विचार करीत असतानाच पुन्हा बंदी आली. सध्या हळद काढणीच्या कामाला मजुरीवर जात आहे. असेच चालले तर मुलांचे शिक्षण, कुटुंबीयांच्या वैद्यकीय खर्चालाही हाती काही राहणार नाही.

-माउली कंठाळे, कारागीर

शासनाला गर्दीचे इतर सर्व उपक्रम चालतात. मात्र, आमच्या दुकानात एकावेळी एकाच ग्राहकाला प्रवेश असतो. शिवाय निर्जंतुकीकरणाच्या साहित्याशिवाय दाढी, कटिंग होत नाही. आम्ही मास्क घातलेला असतो. मग आमच्या व्यवसायाला बंदी घालून आम्हाला देशोधडीला का लावताय?

-बालाजी साखरे, कारागीर