हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:56 IST2025-06-10T12:54:59+5:302025-06-10T12:56:07+5:30

१ जून रोजी पैसे काढत असताना अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्ड बदललं

ATM Card changed by trick; Retired principal realized after 40 thousand was spent | हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं

हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं

वसमत : शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक एटीएमवर पैसे काढत असताना अनोळखी व्यक्तीने हातचालाखीने त्यांचे एटीएम बदलले. काही वेळांनी वेगवेगळ्या ठिकाणावरील एटीएमवरुन ४० हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहरातील आसेगाव कॉर्नरवर असलेल्या एसबीआय बँक एटीएमवर १ जून रोजी दुपारी १:१३ वाजेदरम्यान सेवानिवृत्त मुख्याध्यापक सखाराम आझादे (वय ७९, रा. वसमत) हे एटीएममधून पैसे काढत होते. दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने हातचालाखी करून त्यांचे एटीएम बदलले. नंतर त्यांच्या एटीएम कार्डावरुन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एटीएमवरुन ४० हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार सेवानिवृत्त मुख्याध्यापक आझादे यांच्या लक्षात आला. त्यांनी वेळ न घालवता शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास शहर पोलिस करत आहेत.

Web Title: ATM Card changed by trick; Retired principal realized after 40 thousand was spent