जिल्ह्यात नवे १९७ रुग्ण; दाेघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:29 AM2021-04-10T04:29:10+5:302021-04-10T04:29:10+5:30

हिंगोली जिल्ह्यात अँटीजन चाचणीत ५३५ पैकी १२० जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात नेहरूनगर १, शहरपेठ ...

197 new patients in the district; Death of Daegha | जिल्ह्यात नवे १९७ रुग्ण; दाेघांचा मृत्यू

जिल्ह्यात नवे १९७ रुग्ण; दाेघांचा मृत्यू

Next

हिंगोली जिल्ह्यात अँटीजन चाचणीत ५३५ पैकी १२० जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली परिसरात नेहरूनगर १, शहरपेठ १, पुष्पक कॉलनी १, जिजामातानगर ४, तुप्पा १, वसई, औंढा १, इंदिरानगर १, नांदेड १, बळसोंड १, आजम कॉलनी १, दत्तात्रयनगर १, वरखेडा १, यशवंतनगर १, सुराणानगर १, साईनगर १, यशवंतनगर १, आडगाव ४, भांडेगाव ३, नर्सी २, सिरसम ३ असे एकूण २९ रुग्ण आढळून आले. वसमत परिसरात गिरगाव ३०, हयातनगर ७, कुरुंदा ३, पांगरा शिंदे १, टेंभूर्णी ४ असे ४५ रुग्ण आढळून आले आहेत. कळमनुरी परिसरात चुंचा ६, चिखली १, बाळापूर २, कोंढूर ३, कळमनुरी ११, डोंगरकडा १, बाभळी १, जांभरुण १, सांडस १, येहळेगाव १, कांडली १, घोळवा १, कोंढूर डिग्रस १० असे ४० रुग्ण आढळून आले आहेत. औंढा परिसरात जवळा बाजार येथे ४ रुग्ण आढळून आले आहेत. सेनगावातही दोन रुग्ण आढळून आले.

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात मिलिंद कॉलनी १, सुराणानगर १, तिरुपतीनगर २, जि.प. क्वार्टर्स १, आशीर्वाद कॉलनी १, एनटीसी १, नारायणनगर १, चिंचोली १, लाख औंढा १, हिंगोली ५, औंढा १ असे १५ बाधित आढळले. औंढा परिसरात येळी १, शिरड शहापूर ३, औंढा ४, रांजाळा ३ असे एकूण ११ रुग्ण आढळून आले. वसमत परिसरात एकरुखा १, गाडी मोहल्ला १, शहरपेठ १, डब्ल्यू. एच. क्वार्टर १, चिखली १, हट्टा ५, गुंडा ५, गिरगाव २ असे १७ रुग्ण आढळून आले. कळमनुरी परिसरात डोंगरकडा १, जामगव्हाण १, साळवा २, नवखा १, कोंढूर डिग्रस १, बाळापूर ३, पिंपळखुटा १, कासारखेडा १, रेडगाव ३, जरोडा ५, येळकी ५, देवजना १, बाभूळ १, कळमनुरी ८ असे ३४ रुग्ण आढळून आले. तर १४० जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये हिंगोली जिल्हा रुग्णालयातून ४७, लिंबाळा येथून ३१, वसमतमधून ११, औंढ्यातून १३, सेनगावातून ८ तर कळमनुरीतून ३० जणांना घरी सोडले.

दोघांचा मृत्यू; २१५ गंभीर

शुक्रवारी जिल्ह्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हिंगोलीतील रामाकृष्णा सिटीतील ६० वर्षीय पुरुष तर सेनगाव तालुक्यातील वाघजळी येथील एका ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनामुळे ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ८१८३ रुग्ण आढळून आले. यापैकी ७०२१ जण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजघडीला १०४८ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी १९० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले आहे. तर २५ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

Web Title: 197 new patients in the district; Death of Daegha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.