वेगवेगळ्या कारणांनी अलिकडे हायपरटेंशनची समस्या अधिक होत आहे. हृदयाचं मुख्य काम धमण्यांच्या माध्यमातून ऊर्जा आणि ऑक्सिजन देण्यासाठी शरीरात सगळीकडे ब्लड पंप करणे आहे. धमण्यांच्या माध्यमातून ब्लड फ्लो करण्यासाठी दबावाच्या एका निश्चित मात्रेची गरज असते. जर ब्लड फ्लो चा हा दबाव सामान्य दबावापेक्षा अधिक असतो, तेव्हा रक्त वाहिन्यांवर अतिरिक्त तणाव येतो. यालाच हाय ब्लड प्रेशर किंवा हायपरटेंशन म्हणतात. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनीच्या समस्या होतात. तसेच डिमेंशियासारख्या गंभीर समस्येचा देखील सामना करावा लागू शकतो.
हायपरटेंशनची कारणे काय आहेत?
- अल्कोहोलचं अधिक सेवन करणे
- मिठाचं अधिक सेवन
- एक्सरसाइज न करणे
- आहारात फळ किंवा भाज्यांची कमतरता
- कॉफी किंवा चहाचं अधिक सेवन
- धुम्रपान करणे
- वजन वाढलेलं असणे
- तणाव असणे
- चरबी अधिक असलेले पदार्थ खाणे
- आनुवांशिकता
हायपरटेंशनची लक्षणे
हायपरटेंशनला सामान्यपणे सायलेंट किलर मानलं जातं. कारण सुरूवातील यात लोकांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. तरी काही प्राथमिक लक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.
- जास्त डोकेदुखी
- थकवा
- धुसर दिसणे
- छातीत वेदना होणे
- श्वास घेण्यास अडचण येणे
- सतत चक्कर येणे
- उलटी किंवा मळमळ होणे
- धाप लागणे
- लघवीतून रक्त येणे
कसा कराल कंट्रोल?
- वजन वाढण्यासोबतच हायपरटेंशन वाढतं. त्यासोबतच जर वजन अधिक असेल तर झोपताना श्वासासंबंधी समम्याही होतात, याला स्लीप एप्निया असं म्हणतात. याने हायपरटेंशन अधिक वाढतं. वजन कमी करणे हे हायपरटेंशनला नियंत्रणात ठेवण्याचं सर्वात चांगलं माध्यम आहे.
- दिवसातून ३० ते ६० मिनिटे एक्सरसाइज करा. याने मूडही चांगला राहतो आणि तुम्ही फिट राहता. याने मधुमेह आणि इतर हृदयरोगांचा धोका कमी होतो.
- हायपरटेंशन कमी करण्यासाठी आहारात बदल करावा. फळं, भाज्या आणि कडधान्याचं सेवन करा. तसेच लो फॅट डेअरी पदार्थांचं सेवन करा.
- हायपरटेंशन कमी करण्यासाठी सोडियमचं कमीत कमी सेवन करा. जास्त सोडियममुळे शरीरात द्रव्य तयार सुरू होतं. याने ब्लड प्रेशर अधिक वाढतं.
- मद्यसेवन अधिक केल्याने रक्तदाबासंबंधी समस्या होतात. त्यामुळे मद्यसेवन कमी करा.
- तणावामुळे हायपरटेंशन अधिक वाढतं. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी होणारा तणाव कमी करण्याकडे लक्ष द्यावं.
- धुम्रपानामुळे रक्तदाब वाढतं. त्यामुळे धुम्रपान करू नका. धुम्रपान सोडल्यास हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.