शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लघवीमधून स्पर्म लीक होण्याची कारणं काय असतात? पाहा ही समस्या गंभीर आहे की नॉर्मल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 11:36 IST

Sperm Leakage in Urine Causes: जर ही समस्या जास्त काळ राहत असेल तर याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. अशात लघवीतून स्पर्म का येतं, ही कोणती समस्या आहे आणि यावर उपाय काय हे पाहुयात.

Sperm Leakage in Urine Causes: हेल्थ एक्सपर्ट सांगत असतात की, आपल्या लघवीवरून आपलं आरोग्य कसं आहे याबाबत बरंच काही कळून येतं. अनेकदा लघवीच्या बदललेल्या रंगाचा संबंध वेगवेगळ्या समस्यांशी जोडला जातो. काही लोकांमध्ये लघवीसंबंधी एक वेगळीच समस्या बघायला मिळते. काहींची तक्रार असते की, लघवी करताना त्यांच्या लघवीतून स्पर्म सुद्धा बाहेर पडतात. असं होत असल्याने अनेकजण घाबरतात. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, लघवीतून पांढरा आणि चिकट पदार्थ निघणं काही कोणत्या आजाराचं लक्षण नाही. पण जर ही समस्या जास्त काळ राहत असेल तर याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. अशात लघवीतून स्पर्म का येतं, ही कोणती समस्या आहे आणि यावर उपाय काय हे पाहुयात.

का होते ही समस्या?

काही हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, २० ते ३० वयाच्या तरूणांमध्ये लघवीतून स्पर्म येणं एक सामान्य बाब आहे. बऱ्याच लोकांना तर हे माहितही नसतं की, त्यांच्या लघवीतून स्पर्म येत आहे. काही टेस्ट करून याची माहिती मिळवता येऊ शकते. पण हा काही आजार नसतो. मेडिकल भाषेत याला स्पर्मेटोरिया म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणांनी ही समस्या होते. याचं एक मुख्य कारण म्हणजे शरीरात जास्त वीर्य जमा होणे. नंतर हे वीर्य हळूहळू लघवीद्वारे नॅचरल पद्धतीने बाहेर पडतं. यात घाबरण्यासारखं काही नाही.

प्रोस्टेटमध्ये सूज किंवा इन्फेक्शन

हेल्थ एक्सपर्टनुसार, काही केसेसमध्ये लघवीवाटे स्पर्म बाहेर येण्याचं कारण प्रोस्टेट ग्लँडमध्ये सूज किंवा इन्फेक्शन असू शकतं. जर एखाद्या व्यक्तीने सेक्स वर्करसोबत विना कंडोम संबंध ठेवले तर यामुळे त्याच्या यूरेथ्रामध्ये घातक बॅक्टेरिया जाऊ शकतात. या कारणाने प्रोस्टेटमध्ये सूज, यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा इतर एखाद्या इन्फेक्शनचा धोका असतो. ज्यामुळे स्पर्म लीक होऊ लागतं. ही समस्या टाळण्यासाठी एक्सपर्टचं स्पष्ट मत आहे की, विना प्रोटेक्शन संबंध ठेवू नका. तरी सुद्धा काही समस्या झाली तर डॉक्टरांना भेटा.

एक्सपर्ट सांगतात की, ३५ ते ४० वयानंतर शरीरात स्पर्मचं प्रॉडक्शन कमी होतं आणि त्यानंतर लघवीतून स्पर्म येत नाही. अशात तर आपण तरूण असाल आणि सेक्शुअली अॅक्टिव नसाल तर आपल्याला लघवीतून स्पर्म येण्याची समस्या होऊ शकते. याला घाबरण्याची गरज नाही. कारण हा काही आजार नाही. ही एक नॅचरल प्रोसेस आहे. जर समस्या जास्त असेल, नियमित होत असेल तर डॉक्टरांना भेटून टेस्ट करून घ्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sperm Leakage in Urine: Causes, Concerns, and When to Worry

Web Summary : Sperm in urine is often normal for young men due to excess semen. However, prostate issues or STIs could be factors. If persistent or concerning, consult a doctor.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य