शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

काही लोक सतत चिडचिड का करत असतात? जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 2:52 PM

प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा स्वभाव असतो. आपल्यापैकी बरेचजण काही कारणामुळे चिडचिड करत असता. पण हे तेवढ्यापुरती मर्यादित असते. मात्र काही  माणसं सतत चिडचिडी असतात. त्या मागची कारणं जाणून घेऊयात...

प्रत्येक व्यक्तीला स्वत:चा असा स्वभाव असतो. आपल्यापैकी बरेचजण काही कारणामुळे चिडचिड करत असता. पण हे तेवढ्यापुरती मर्यादित असते. मात्र काही  माणसं सतत चिडचिडी असतात. चिडचिड करण्यासाठी त्यांना काही कारण पुरते. असा चिडचिडा स्वभाव असला तर त्यांच्यामुळे घरातील वातावरणही खराब होते. डॉ. तिमोथी लेग यांनी मेडिकल न्युज टुडेला दिलेल्या माहितीनूसार अशी काही कारण आहेत, ज्यामुळे ती व्यक्ती सतत चिडचिड करते.

अर्थरायटीस किंवा अन्य क्रॉनिक पेनजर एखाद्या व्यक्तीला काही गंभीर दुखणे असेल तर त्यामुळे त्या व्यक्तीची चिडचिड होणे स्वाभाविक असते. अशी माणसं त्यांच्या दुखण्यामुळे सतत त्रस्त असतात. त्यामुळे ती सतत चिडचिड करत राहतात.

डिप्रेशनडिप्रेशन ही अशी समस्या आहे ज्यात व्यक्ती सतत चिडचिडा असतो. सतत उदास असणे, एकटेपणाची भावना असणे यामुळे ही व्यक्ती सतत चिडचिड करते. लक्षात घ्या, चिडचिडेपणा हे डिप्रेशनचे प्रमुख लक्षण आहे.

डिमेंशियाडिमेंशिया हा मानसिक आजार आहे. वय वाढल्यामुळे काही व्यक्तींना डिमेंशियाचा सामना करावा लागतो. यामध्ये व्यक्ती रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीही विसरतो. त्यामुळे त्याच्या रोजच्या कामांमध्ये अडथळा येतो. हेच कारण असते की त्यामुळे ती व्यक्ती चिडचिड करते.

सतत चिंता करणंसतत चिंता केल्याने काही व्यक्ती सतत चिडचिडेपणा करतात. लहान मोठ्या गोष्टीवर कटकट करतात. सततच्या चिंतेमुळे त्या व्यक्तीच्या मेंदुतील काही रासायनिक प्रक्रिया असंतुलित होतात. त्यामुळे चिडचिड अधिक वाढते.

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स