Tobacco in your vagina to boost libido can causes of cancer | ...म्हणून महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवत आहेत तंबाखू; डॉक्टरांनी म्हणाले, असं करणं जीवघेणं!
...म्हणून महिला प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवत आहेत तंबाखू; डॉक्टरांनी म्हणाले, असं करणं जीवघेणं!

नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूचा वापर आता काही लोक सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा वाढवण्यासाठी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महिला तंबाखू प्रायव्हेट पार्टमध्ये ठेवून सेक्स ड्राइव्ह बूस्ट करत असल्याचं आढळून आलं आहे. यावर डॉक्टरांचं असं मत आहे की, सेक्स ड्राइव्ह वाढवण्यासाठी असं करून महिला त्यांचं जीवन धोक्यात टाकत आहेत.

डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, लोक एकीकडे असं करण्याला सेक्स ड्राइव्ह बूस्ट करण्याचा फॉर्म्यूला सांगत आहेत. तेच दुसरीकडे डॉक्टरांनी याबाबत इशारा दिला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, असं करून तुम्ही नेहमीसाठी लैंगिक सूख गमावून बसू शकता. स्मोकिंग प्रॉडक्टच्या माध्यमातून सेक्स ड्राइव्ह बूस्ट करणं मृत्यू ओढवून घेण्यासारखं आहे.

प्राध्यापक पास्कल फॉमेन म्हणाले की, 'तंबाखू अल्सरसारख्या आजारांचं कारण ठरत आहे. याने महिलांचा प्रायव्हेट पार्ट आकुंचन पावेल, कठोर होईल आणि नेहमीसाठी ते बंदही होऊ शकतं'.

Sci Dev Net च्या एका रिपोर्टनुसार, तंबाखूमुळे सामान्यपणे होणाऱ्या मेन्स्ट्रूएशनही प्रभावित होतं. मेन्स्ट्रूएशनवर प्रभाव पडल्याने महिलांना गर्भधारणा करण्यातही अडचण येऊ शकते.

डॉक्टर अब्दुलाये डियोप म्हणाले की, तंबाखूच्या अशा वापराने प्रायव्हेट पार्ट आकुंचण पावतो. प्रायव्हेट पार्टमध्ये तंबाखू ठेवणाऱ्या पीडितांनी हे जाणवलं आहे की, त्यांचा प्रायव्हेट पार्ट आकुंचण पावला, कारण त्यांच्या आतील मांसपेशी मागच्या बाजूने सरकू लागल्या आहेत.

अशाप्रकारच्या जास्तीत जास्त घटना आफ्रिकेतील देश सेनेगलमध्ये समोर आले आहेत. या देशातील अनेक महिला शारीरिक सूख मिळवण्यासाठी आपल्या जीवनाशी खेळत आहेत. तेथील लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, तंबाखूमुळे त्यांना परमोच्च आनंद मिळू शकतो.

दरम्यान तंबाखूचा वापर करण्यासाठी आधी त्यात काही दुसरे पदार्थ मिश्रित केले जातात. तंबाखूमध्ये सोडा आणि शिआ बटर मिश्रित केलं जातं. याचा अशाप्रकारे वापर फारच घातक ठरू शकतो. रिपोर्ट्सनुसार, याचा वापर केल्यावर चक्कर येणे, जळजळ होणे यांसारख्या प्राथमिक समस्या होतात. इतके साइड इफेक्ट असूनही या घटना कमी होत नाहीत.


Web Title: Tobacco in your vagina to boost libido can causes of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.