शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाच्या दुर्गंधीमुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात? 'या' घरगुती उपायांनी मिळेल दुर्गंधीपासून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 12:37 IST

कोणत्याही व्यक्तीचा चेहरा आणि बॉडी लॅन्गवेज पाहून इतर लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतात.

कोणत्याही व्यक्तीचा चेहरा आणि बॉडी लॅन्गवेज पाहून इतर लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होत असतात. पण कितीही सुंदर किंवा आकर्षक शरिरयष्टी असली तर हसताना किंवा बोलताना तुमच्या श्वासांचा दुर्गंध येत असेल तर तुमचं इंप्रेशन खराब होऊ शकतं. या समस्येचा सामना जर तुम्हाला सतत करावा लागतं असेल तर ही समस्या खूप त्रासदायक ठरू शकते. त्यासाठी आपल्या तोंडातून येत असलेली दुर्गंधी रोखण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं  आहे. आज आम्ही तुम्हाला काही घरुगुती उपाय सांगणार आहोत . ज्यांचा वापर करून तुम्ही श्वासांना येत असेलेला दुर्गंध रोखू शकता. 

(image credit- health magazine)

तोंडातून येत असलेला दुर्गंध हा काहीही खाल्यानंतर लगेच चुळ न भरणे, दातांची आणि तोंडाची स्वच्छता न करणे यांमुले सुद्धा येऊ शकतो. तसंच तंबाखूच्या सेवनाने सुद्धा समस्या उद्भवू शकते. तोंट सुकल्यासारखं वाटत असेल तर ओरल इन्फेक्शन होण्याचा सुद्धा धोका असतो. तोंडात असलेले लाळ ही तोंडाला हायड्रेट ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं असतं. लाळेत असलेले ऐंटीबैक्टीरियल प्रॉपर्टीज  दातांच्या रोगांपासून वाचण्यास मदत करतात. कारण त्यामुळे दातांमध्ये अनेक प्रकारचे आजार घर करून असतात. 

जर तुम्हाला तुमच्या तोंडातून येत असलेल्या दुर्गर्धीची लाज वाटत असेल तर तुम्ही दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. जेवण करण्याच्या १० मिनिट आधी आणि जेवण झाल्यानंतर १०  मिनिटांनी पाणी प्यायला विसरू नका. त्यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासोबतच ओरल हेल्थ सुद्धा चांगली राहील.

शुगर फ्रि कॅन्डी

(image credit- farnendermer.com)

तोंडाचा वास येऊ नये म्हणून तुम्ही शुगर फ्रि कॅन्डी  किंवा च्विंगम खा. यामुळे तुमच्या दातांचा व्यायाम होण्याबरोबरच तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होईल. तसंच त्यामुळे गालांचा आकार व्यवस्थित होतो. 

साखर ,मीठ आणि मद्याच्या  सेवनावर नियंत्रण

(image credit-medimetry)

जर तुम्हाला चहा किंवा कॉफी पिण्याची आवड असेल तर या गोष्टीचा तुमच्या  दातांवर परिणाम होऊ शकतो.  गरजेपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे तुमच्या तोंडाला वास येण्याची शक्यता असते.  तसंच मद्याचं अतिेसेवन  सुद्धा तोंडाला येत असलेल्या वासाचे कारण ठरू शकतं. त्यासाठी तुम्ही आहारात साखरेचे प्रमाण कमी ठेवा. (हे पण वाचा-थंड की गरम....केस धुण्यासाठी कोणतं पाणी चांगलं असतं?

दिवसातून दोनवेळा ब्रश करा

श्वासांची दुर्गंधी येऊ नये असं जर तुम्हला वाटत असेल तर  सकाली उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी तीनवेळा ब्रश करा. त्यामुळे अनेक तासांपर्यत तुमच्या तोंडातून दुर्गंध येणार नाही.  नाष्ता किंवा काहीही खाल्यानंतर चुळ भरा.  याशिवाय दुर्गंधीपासून  सुटका मिळवायची असल्यास आहारात गाजर आणि ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरेल. तसंच वेळोवेळी दातांची तपासणी करून दातानां कसं चांगलं आणि स्वच्छ ठेवता येईल असा प्रयत्न करा. (हे पण वाचा-वजन कमी करण्यासाठी 'या' तीन डाळी ठरतात परफेक्ट उपाय, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स