वजन कमी करण्यासाठी 'या' तीन डाळी ठरतात परफेक्ट उपाय, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 11:20 AM2020-01-23T11:20:30+5:302020-01-23T11:24:25+5:30

सध्याच्या काळात ऑफिसच्या आणि घरच्या कामातून वेळ मिळत नसल्यामुले अनेकजणांना व्यायाम करायला पुरेला वेळ मिळत नाही.

Weight loss Diet include these 3 pulse beneficial for health | वजन कमी करण्यासाठी 'या' तीन डाळी ठरतात परफेक्ट उपाय, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

वजन कमी करण्यासाठी 'या' तीन डाळी ठरतात परफेक्ट उपाय, इतर फायदे वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

सध्याच्या काळात ऑफिसच्या आणि घरच्या कामातून वेळ मिळत नसल्यामुळे अनेकजणांना व्यायाम करायला पुरेला वेळ मिळत नाही. व्यायाम करायचं ठरवलं तरी  काहीतरी अडचणी येत असतात. त्यामुळे फिटनेस मेन्टेंन करणं शक्य होत नाही. पण तुम्हाला वजन वाढल्यामुळे जास्त टेंशन येत असेल किंवा वजन कसं कमी करता येईल याचा तुम्ही विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला घरगुती वापरात असलेल्या डाळींचा वापर  करून तुम्ही स्वतःला कसं फिट ठेवू शकता हे सांगणार आहोत. 

Related image

भारतीय आहारात डाळींचा समावेश पुर्वापारपासून  आहे. डाळी खायच्या म्हटलं तर त्यात बोअर होण्यासारखं काहीच नाही. कारण आपल्याला डाळी खात असताना वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध होत असतात. मसूरची, मुगाची, तुरीची, उडीळाची, मटकीची डाळ अशा अनेकविध डाळींचा आहारात समावेश केलात तर काहीही एक्स्ट्रा डाएट न करता तुम्ही आपलं वाढलेलं वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया डाळींचा कसा वापर केल्याने तुमचं वजन  कमी होईल.  

Related image
मुगाची डाळ

Image result for mugdal

मुगाच्या डाळीचा वापर करून तुम्ही स्वतःच वजन कमी  करू शकता. मुगाच्या डाळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. अनेकदा डॉक्टर रूग्णांना मुगाची डाळ आहारात घेण्याचा सल्ला देतात.  मुगाच्या डाळीत असलेले फायबरर्स  तुम्हाला जास्तवेळ उर्जा देण्यासाठी उपयोगी असतात. भूक लागल्यास  जर तुम्ही मुगाच्या डाळीपासून तयार केलेल्या पदार्थाचं सेवन केलं तर बराचवेळ पोट भरलेलं राहील. गॅस होण्याची समस्या मुगाच्या डाळीमुळे दूर होते. मुगाच्या डाळीमुळे  पचनक्रिया व्यवस्थित राहते. 

मसूरची डाळ

Image result for masoor dal

मसूरच्या डाळीत कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.  मसूरच्या डाळीत फायबर्स असतात. बद्धकोष्ठ असलेल्यांसाठी चांगले ठरतात. मसूरच्या डाळिमुळे पचनानंतर तयार होणाऱ्या मळाला भरीवपणा येतो आणि आतडय़ांची हालचालही वाढते. वजन कमी करण्यासाठी या डाळीचे सेवन लाभदायक ठरते.

कुळिथची डाळ

Related image(image credit- deccan hearald .com)

कुळिथ म्हणजेचं हुलग्याची  डाळं  शरीरातील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर  ठरतं असते. लोहाची कमतरता दूर करण्यासाठी ही डाळ उपयुक्त  असते. तसंच हिवाळ्याच्या दिवसात शरीराचे तपमान राखण्यासाठी देखील या डाळीचं सेवन करतात. शरीरातील फॅट कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. कुळीथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात. या कडधान्यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टळते. हुलग्याच्या डाळीचं सेवन केल्यानंतर भरिवपणा वाटत असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटत असतं. भूक लवकर लागत नाही.

Web Title: Weight loss Diet include these 3 pulse beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.