आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 07:08 AM2024-05-11T07:08:44+5:302024-05-11T07:27:58+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - May 11, 2024; Stay away from any illegal activities, otherwise you trouble in | आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...

आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...

मेष - आज चंद्र रास बदलून 11 मे, 2024 शनिवार च्या दिवशी मिथुन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपले मन चंचन झाल्याने निर्णय घेणे कठीण जाईल व त्यामुळे महत्वाची कामे आपण पूर्ण करू शकणार नाही. प्रतिस्पर्ध्यांशी सामना करावा लागेल. नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. बौद्धिक किंवा तांत्रिक चर्चेत आपण सहभागी होऊ नये. आज छोटासा प्रवास संभवतो. आज स्त्रीयांनी आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.  आणखी वाचा

 

वृषभ -  आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मन स्थिर ठेवून काम न केल्यास चांगल्या संधी हातातून निसटून जाऊ शकतात. आज हट्ट न करता समाधानी राहिलात तर चांगले होईल. ठरविलेले प्रवास होणार नाहीत. भावंडां कडून प्रेम व सहकार्य मिळेल. कलावंत, कारागीर, व लेखक हे आपली प्रतिभा दाखवू शकतील. स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा

 

मिथुन -  आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आपणास प्रसन्नता व उत्साह यांचा अनुभव येईल. स्वादिष्ट भोजन व चांगले कपडे घालावयास मिळतील. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवाल. त्यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. आर्थिक फायदा होईल.  आणखी वाचा

 

कर्क - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस जास्त खर्च होण्याचा आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक असणार नाही. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा होईल. संभाव्य वाद टाळण्यासाठी बोलण्यावर संयम ठेवा. इतरांचे गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.  आणखी वाचा

 

सिंह - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ होईल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. मित्रांसह रम्य स्थळाला भेट देऊ शकता. स्त्री मित्रांचे विशेष सहाय्य मिळेल. मुलाची भेट होईल. वाडवडील किंवा मोठया भावंडांचा सहवास मिळेल. एखादा मंगल प्रसंग असू शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. पत्नीचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

 

कन्या -  आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण नव्या कामाची जी योजना बनवली आहे ती पूर्ण होईल. व्यापार व नोकरी असलेल्यांना आजचा दिवस फायद्याचा आहे. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने पदोन्नतीची संधी मिळेल. पितृघराण्या कडून फायदा होईल. स्वास्थ्य चांगले राहील. कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील. पत्नीसह चांगला वेळ घालवाल.  आणखी वाचा

 

तूळ - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. प्रवासाची संधी मिळेल. परदेशात राहणारे मित्र व सगे सोयरे ह्यांची खुशाली समजल्याने आपण आनंदात राहाल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संततीची चिंता लागून राहील. आणखी वाचा

 

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. कफ, श्वास, किंवा पोट यांचा त्रास होऊ शकतो. शरीराने व मनाने आज आपण अस्वस्थ राहाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणतेही अवैध काम किंवा सरकारी काम ह्या पासून दूर राहा, नाहीतर अडचणीत याल. जलाशया पासून दूर राहा.  आणखी वाचा

 

धनु - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील.भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल. त्यांच्याशी रोमांचक भेट होईल. विचारात स्थैर्य राहणार नाही. भागीदारीत फायदा होईल. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील. आणखी वाचा

 

मकर -  आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज व्यापार - व्यवसायात मोठे यश मिळाले तरी आपण कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायाच्या दृष्टीने केलेल्या भावी योजना यशस्वी होतील. आर्थिक देवाण - घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. देश- परदेशात व्यवसाय असणार्याना फायदा होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. धनलाभ संभवतो.  आणखी वाचा

 

कुंभ -आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण बौद्धिक क्षमता, लेखनकार्य व नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाहीत व त्यात सातत्याने बदल होत राहील. स्त्रीयांनी आपली वाणी संयमित ठेवावी. शक्यतो आज प्रवास टाळावेत. संतती संबंधी प्रश्न भेडसावतील. आज नवीन काम सुरू न करणे हितावह राहील.  आणखी वाचा

 

मीन - आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवावी लागतील. घरातील वातावरण बिघडू नये ह्यासाठी संभाव्य वाद टाळावेत. आईचे आरोग्य बिघण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी संभवते. स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे. उत्साह व स्फूर्तीचा अभाव जाणवेल. शक्यतो प्रवास टाळावेत. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे.  आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - May 11, 2024; Stay away from any illegal activities, otherwise you trouble in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app