शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवस कडक उपवास करताना स्वत:चे आरोग्यही जपा; प्रकृतीकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 10:38 IST

उपवासात सफरचंद, पेरू, पपई, द्राक्षे, खजूर यांसारखी फळे खाणे ऊर्जा टिकवण्यास मदत करते

मुंबई :  नवरात्रोत्सव हा श्रद्धेचा आणि साधनेचा काळ आहे. नऊ दिवसांच्या या पर्वामध्ये अनेकजण उपवास करतात. मात्र, उपवास करताना आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे काही महत्त्वाच्या आहार आणि जीवनशैलीसंबंधी टिप्स जाणून घेणे आवश्यक आहे.

उपवासाचे स्वरूप प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे असते. काही जण पूर्ण कडक उपवास करतात, तर काही फलाहार करतात. त्यामुळे उपवास करताना ऊर्जा टिकवणे, पचनसंस्था ठीक ठेवणे आणि डिहायड्रेशन टाळणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉक्टरांनी केले. 

फलाहार, सुकामेवा, ताक उत्तमउपवासात सफरचंद, पेरू, पपई, द्राक्षे, खजूर यांसारखी फळे खाणे ऊर्जा टिकवण्यास मदत करते. बदाम, अक्रोड, काजू हे सुके मेवे प्रथिनांचा चांगला स्रोत आहेत. उपवासासाठी राजगिरा, साबुदाणा यांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषणमूल्ये मिळतात. दूध, ताक, दही, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ हे प्रोटीन व कॅल्शियम देणारे असल्यामुळे यांचा वापर उपयुक्त ठरतो.

खाण्याची वेळ ठरवाभरपेट जेवण टाळा आणि दर दोन ते तीन तासांनी काही ना काही हलके  खा. त्यामुळे पोटावर ताण येत नाही आणि आम्लपित्त होण्याचा धोका कमी होतो.

तेलकट, तुपकट, गोड पदार्थांना घाला मुरड 

साबुदाणा खिचडी, वडे, पापड हे पदार्थ अत्यंत चविष्ट असले, तरी त्यातील तळणीमुळे पचनावर ताण येतो. त्यामुळे शक्य असल्यास कमी तेलात पदार्थ तयार करा. तसेच फार गोड पदार्थ खाल्ल्यास रक्तातील साखरेचा स्तर झपाट्याने वाढतो, हे टाळा.

पाणी पिणे  विसरू नका

उपवासात तहान कमी लागते असे वाटते, पण प्रत्यक्षात शरीर डिहायड्रेट होते. त्यासाठी दिवसभरात आठ ते १० ग्लास पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी, पन्हे अशा नैसर्गिक पेयांचा समावेश करा. चहा-कॉफीसारख्या कॅफिनयुक्त पेयांचे सेवन कमी करा.

...तर डॉक्टरांचा सल्ला घ्या 

मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड किंवा अन्य गंभीर आजार असलेल्यांनी उपवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपवासावेळी चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे ही लक्षणे  दिसू शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उपवास हा डिटॉक्सिफिकेशनचा एक नैसर्गिक मार्ग आहे. पण, यासाठी योग्य आहार घेणे अत्यावश्यक आहे. शरीराला आवश्यक ती ऊर्जा, पाणी आणि पोषण मिळाले, तर उपवास अधिक लाभदायक ठरतो. नवरात्राच्या उपवासात श्रद्धेसोबत शारीरिक स्वास्थ्याचीही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल

टॅग्स :Fasting & Foodनवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४Healthआरोग्य