(Image Credit : workskills.org.au)

ऑफिसमध्ये दुपारच्या जेवणानंतर एक छोटीशी झोप काढणारे अनेकजण नेहमी टिकेचा विषय ठरत असतात. पण नुकत्याच एका सर्व्हेतून समोर आले की, भारतीय लोक कामादरम्यान एक छोटीशी डुलकी घेतल्यास त्यांच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते. हा सर्व्हे ऑनलाइन स्लीप सल्यूशन स्टार्टअप वेकफिटकडून करण्यात आला आहे. वेकफिटने 'राइट टू वर्क नॅप्स' नावाच्या सर्व्हेमध्ये १५०० लोकांना सहभागी करून घेतले होते.

(Image Credit : www.thestatesman.com)

या सर्व्हेनुसार, ७० टक्के लोकांकडे त्यांच्या कामाच्या ठिकाणी झोपण्यासाठी रूम(नॅप रूम)ची व्यवस्था नव्हती. तेच ८६ टक्के लोकांनी हे सांगितले की, वर्कप्लेसवर नॅप रूम असेल कर निश्चितपणे कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. तसेच या सर्व्हेतून असेही समोर आले की, ४१ टक्के लोक कामाच्या तणावामुळे आणि रात्री उशीरापर्यंत काम करत असल्याने पुरेशी झोप घेऊ शकत नाहीत. 

(Image Credit : www.indiatimes.com)

वेकफिटचे को-फाउंडर आणि डिरेक्टर चैतन्य रामालिंगा गौडा म्हणाले की, आपल्या देशात कामामुळे झोप प्रभावित होण्याबाबत आम्हाला असं जाणवलं की, वर्कप्लेसमध्ये एक नॅप रूमसाठी प्रोत्साहित करणे गरजेचं होतं. 

(Image Credit : scrolltoday.com)

तसेच, सर्व्हेमधून असेही समोर आले की, सततच्या कामाच्या चिंतेमुळे ३१ टक्के लोकांची रात्रीची झोप डिस्टर्ब झाली. तर २० टक्के लोकांना प्रत्येकवेळी काम करताना झोप जाणवली आणि ५१ टक्के लोक हे जास्तवेळ झोपेतच राहिले.

(Image Credit : www.contemporist.com)

वेकफिटच्या वार्षिक सर्व्हेमधून असं समोर आलं की, ८० टक्के लोकांना आठवड्यातून एक ते तीन दिवस कामादरम्यान झोपेची जाणीव झाली. तेच कॉफी आणि चहा हे झोप दूर करण्यासाठी लोकप्रिय पर्याय आहेत.

(Image Credit : www.contemporist.com)

सर्व्हेनुसार, ३३ टक्के लोकांना हवं होतं की, त्यांच्या कंपन्यांनी कामात सुधारणा व्हावी यासाठी नॅप रूमची व्यवस्था करावी. तसेच सर्व्हेमधून समोर आले की, २०-३० मिनिटांची डुलकी घेतल्याने शॉर्ट टर्म अलर्टनेस वाढतो.


Web Title: Survey says that most Indians feel napping at workplace may improve productivity
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.