शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

स्त्रीयांमध्ये वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, या लक्षणांकडे चुकूनही करू नका कानाडोळा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 14:34 IST

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे.

(Image credit- thoughtco.com)

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत आहे. राहणीमानात तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्याने कर्करोगाचा आजार होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नव भारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार  देशाच्या कानाकोपऱ्यात कर्करोग  हा जीवघेणा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मागील वर्षी आरोग्य मंत्रालयातर्फे एक आलेख सादर करण्यात आला होता. ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या  कॅन्सरचे वाढते प्रमाण दाखवले गेले होते. इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्वसाधारणपणे कॅन्सर रुग्णांमध्ये फुफूसांचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग, सर्व्हायकल कर्करोग या कर्करोगांचे प्रमाण सर्वाधिक आहेत.

 (Image credit- Drug target review)

त्वचा, स्नायू, सांधे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, रक्ताभिसरणसंस्था, मज्जासंस्था, जननसंस्था, अंतःस्त्रावी ग्रंथी, रक्तपेशी, डोळा, कान, जीभ, स्तन, रससंस्था, इत्यादी कोणत्याही ठिकाणी कर्करोग निर्माण होऊ शकतो. हा आजार लगतच्या भागांत वाढत जातो किंवा रक्त वा रसावाटे पसरू शकतो. भारतामध्ये काही प्रकारचे कर्करोग विशेष प्रमाणात आढळतात. स्त्री-पुरुषांमध्ये कर्करोगाचे प्रमाण थोडे बदलते. भारतात कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण-तोंडाचा अंतर्भाग,  स्तनांचा कर्करोग या भागाशी संबंधित असतात.जाणून घ्या  स्तनांच्या कर्करोगाची लक्षणं आणि कारणं 

(Image credit-qimrberghofer.edu)

स्तनाचा कर्करोगातील प्रारंभिक लक्षणे स्तनात गाठ तयार होणे.स्तनाच्या त्वचेवर खड्डे पडणे.स्तनाच्या त्वचेवर रंगात बदल.स्तनामध्ये दुखणे.स्तनाच्या टोकाला खाज सुटणे.स्तनामधून स्त्राव येणे.स्तनाच्या टोकावर भेगा पडणे व वेदना होणे.

(Image credit-wespeakscience)

स्तनांच्या कर्करोगांची कारणे

आपल्या शरीरातील पेशींची जेंव्हा अनिर्बंध वाढ होऊ लागते तेंव्हा कर्करोगाची लागण होते. त्याच प्रमाणे जेंव्हा स्तनातील पेशींची अनिर्बंध वाढ होते तेंव्हा स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे दिसू लागतात. स्तनाच्या पेशीत होणाऱ्या बदलाचा संबध स्त्री संप्रेरक एस्त्रोजन ह्याच्याशी निगडीत असल्याचे वैज्ञानिक रित्या सिद्ध झाले आहे.

  (Image credit-biomedcentral.com)

स्त्रियांमध्ये वयोगट ४० वर्षावरील महिला.तसेच ज्यांच्या घराण्यात कर्करोग हा अनुवांशिक आहे. अशा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो. ज्या स्त्रियांमध्ये मासिक पाळी लवकर सुरु झाली आहे.  ज्या स्त्रिया स्थूल आहेत किंवा ज्या स्त्रिया गर्भधारणा होऊ नये म्हणून नियमित गोळ्या घेत आहेत, अशांमध्ये स्तनाच्या कर्करोगाची शक्यता जास्त असू शकते. जर मुले वयाच्या तिशीनंतर झाली असतील तर अशा स्त्रियांना धोका असू शकतो. 

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्य