शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मासिक पाळीमध्ये वर्कआउट करताय?; थोडं थांबा आधी 'हे' वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 3:49 PM

वर्कआउट हेल्दी अन् फिट राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. धावपळीच्या आयुष्यात स्वतःला फिट ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस वर्कआउट करणं गरजेचं असतं. पण महिलांना प्रत्येकवेळी हे रूटिन फॉलो करायला जमेलच असं नाही.

(Image Credit : Building Muscle 101)

वर्कआउट हेल्दी अन् फिट राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. धावपळीच्या आयुष्यात स्वतःला फिट ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी पाच दिवस वर्कआउट करणं गरजेचं असतं. पण महिलांना प्रत्येकवेळी हे रूटिन फॉलो करायला जमेलच असं नाही. खासकरून मासिक पाळीदरम्यान काही महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसांमध्ये अनेक महिलांसमोर असणारा प्रश्न म्हणजे, या दिवसांमध्ये वर्कआउट करावं की नाही? 

शरीरात अनेक बदल घडून येतात

मासिक पाळी दरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात. हे त्यांच्या प्रजनन क्षमतेशी निगडीत प्रक्रिया असते. त्यामुळे स्वाभाविकच यादरम्यान शरीराच्या आतमध्ये अनेक बदल होतात. याच पाच दिवसांमध्ये त्यांचं शरीर आणि मन दोन्हींमध्ये फार परिवर्तन दिसून येतं. काही महिलांना या दिवसांमध्ये हार्मोन चेंजेसमुळे मूड स्विंग्सचाही सामना करावा लागतो. 

वेदनांमुळेही होतो त्रास 

मासिक पाळीदरम्यान पोट आणि ओटी पोटामध्ये वेदना होतात. त्यामुळे अनेकदा हैराण व्हायला होतं. एवढचं नाहीतर यामुळे काहीही करणं अगदी अवधड होऊन जातं. काही महिलांना तर मासिक पाळी सुरू होण्याआधीपासूनच पिरियड क्रॅम्स यायला सुरू होतात. यामध्ये पोट, पाठही दुखते. या दिवसांमध्ये अॅसिडिटीही वाढते. 

हेव्ही वर्कआउटपासून दूर राहा 

जर तुम्ही मासिक पाळीच्या वेदनांनी हैराण आहात तर जास्त हेव्ही वर्कआउट करू नका. त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मासिक पाळीमध्ये होणारा त्रास दूर होईपर्यंत वर्कआउट करणं टाळलं तरिही चालेल. तसेच या दिवसांमध्ये डाएटची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. 

करू शकता प्राणायाम आणि ध्यान 

प्राणायाम आणि ध्यान दोन्ही अशा क्रिया आहेत. ज्या करण्यासाठी शरीराला फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. तसेच यामुळे मनाला शांती मिळण्यास मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर मासिक पाळीमध्ये प्राणायाम आणि ध्यान करू शकता. त्यामुळे मूड स्विंग्सपासून तुमची सुटका होण्यास मदत होईल. (टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणाताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWomenमहिला