शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

देशात लठ्ठपणाची गंभीर समस्या, जंक फूडमुळे ५४ प्रकारचे आजार; निरोगी जीवनशैलीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 05:55 IST

लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांमधील लठ्ठपणा हा सुद्धा चिंतेचा विषय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिली : बदलत्या जीवनशैलीमुळे भारतात वेगाने वाढत असलेल्या लठ्ठपणामुळे आर्थिक पाहणी अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आरोग्यासाठी पोषक नसलेला आहार तसेच जंकफूडमध्ये ५४ प्रकारचे आजार वाढले आहेत. लठ्ठपणाच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी निरोगी जीवनशैली अंगिकारण्यावर भर दिला पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे. 

लहान मुले, तरुण आणि वयोवृद्धांमधील लठ्ठपणा हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. जर भारताला लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा योग्य रितीने फायदा उठवायचा असेल तर आरोग्याच्या निकषांवर देशातील नागरिकांची स्थिती चांगली असायला हवी, त्यांनी योग्य प्रकारच्या आहाराला प्राधान्य दिले पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे. 

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अहवालाचा दाखला आर्थिक पाहणी अहवालात दिला आहे. यात म्हटले आहे की, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन आणि शारिरीक हालचालींमध्ये झालेली घट यामुळे देशांत वजन वाढण्याची तसेच लठ्ठपणाची समस्या वाढली आहे. भारतात वयोवृद्धांमधील लठ्ठपणा वाढीचा वेग तीन टक्केपेक्षा अधिक आहे. 

गावांच्या तुलनेत शहरांमध्ये वेगाने वाढराष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसार (एनएफएचएस) भारतात ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा वेग अधिक आहे. शहरांमध्ये हा वेग २९.८ टक्के तर ग्रामीण भागामध्ये १९.३ टक्के इतका आहे. १८ ते ६९ या वयोगटातील पुरुषांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण २२.९ टक्के इतके आहे. वर्षभरापूर्वी हे प्रमाण १८.९ टक्के इतके होते. महिलांमधील लठ्ठपणाचे प्रमाण यात काळात २०.६ टक्क्यांवरून वाढून २४ टक्के इतके झाले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य