शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
3
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
4
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
5
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
6
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
7
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
8
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
9
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Nipah Test Kit: भारताच्या हाती मोठे शस्त्र; तासाभरात निपाहचा रिझल्ट येणार, किटला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 14:20 IST

Nipah Test Kit: कोरोनानंतर भारतीयांची निपाह व्हायरसने झोप उडविली आहे. अद्याप हा व्हायरस केरळमध्येच असला तरीदेखील आजुबाजच्या कर्नाटक, तामिळनाडू राज्यांमध्ये काळजी घेतली नाही तर पसरण्यास वेळ लागणार नाही.

कोरोनानंतर भारतीयांची निपाह व्हायरसने (Nipah virus) झोप उडविली आहे. अद्याप हा व्हायरस केरळमध्येच असला तरीदेखील आजुबाजच्या कर्नाटक, तामिळनाडू राज्यांमध्ये काळजी घेतली नाही तर पसरण्यास वेळ लागणार नाही. महत्वाचे म्हणजे निपाह व्हायरसचा स्वॅब हा पुण्याच्या लॅबमध्ये पाठवावा लागतो. जी चूक कोरोनाकाळात झाली ती आता होणार नाहीय. आता यापुढे एका तासातच निपाह व्हायरसची लागण झालीय की नाही याची माहिती मिळणार आहे. (Truenat test kit gets emergency use approval from DCGI for Nipah virus)

निपाह व्हायरसच्या वाढत्या धोक्यावर भारताच्या हाती मोठे शस्त्र लागले आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने गोव्याची कंपनी मोल्बियो डायग्नोस्टिकच्या टेस्ट किटला आपत्कालीन परवानगी दिली आहे. ट्रूनेट नावाच्या या टेस्ट किटद्वारे एका तासात रिझल्ट येणार आहे. हे टेस्ट किट आरटीपीसीआर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. निपाह व्हायरसचा शोध घेणारे हे पहिले टेस्ट किट आहे. 

ट्रूनेट पूर्णपणे स्वदेशी आणि बॅटरीवर चालणाऱ्या आरटीपीसीआर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. याच्या माध्यमातून जवळपास 30 रोगांची तपासणी केली जाऊ शकते. तसेच तासाभरात याचे रिझल्ट येतात. या किटमुळे टीबी, कोरोना, डेंग्यू, चिकनगुनिया, हिपॅटायटीस, एचपीवी सारख्या रोगांची तपासणी केली जाऊ शकते. 

मोल्बियोचे सीटीओ चंद्रशेखर नायर यांनी सांगितले की, हे टेस्ट किट ब्रिफकेसमध्ये ठेवून कुठेही नेता येऊ शकते. हे किट आंतरराष्ट्रीय बाजारातही लाँच करण्यात आले आहे. त्याचे पेटंटही करण्यात आले आहे. कमी काळाच्या प्रशिक्षणानंतरदेखील हे किट वापरता येईल, असे डिझाईन करण्यात आले आहे. निपाह व्हायरसचा पहिला रग्ण 2001 मध्ये सिलीगुडीमध्ये आढळला होता. त्यानंतर 2007 मध्ये पश्चिम बंगाल आणि 2018 मध्ये केरळच्या कोझिकोडमध्ये आढळला होता.

टॅग्स :Nipah Virusनिपाह विषाणू