शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 12:28 IST

Corona Virus : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा XFG व्हेरिएंट समोर आला असून त्याला स्ट्रेटस असं म्हटलं जातं.

गेल्या काही वर्षांत कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे. व्हायरसचं बदलतं स्वरूप चिंतेचं कारण आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा XFG व्हेरिएंट समोर आला असून त्याला स्ट्रेटस असं म्हटलं जातं. जानेवारीमध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा आढळला आणि आता तो अनेक देशांमध्ये पसरला आहे. तज्ज्ञांच्या मते, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे आणि भारतासह संपूर्ण जगाने सतर्क राहण्याची गरज आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये स्ट्रेटस पहिल्यांदा आढळून आला. जूनपर्यंत तो ३८ देशांमध्ये पसरला होता. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने (CDC) म्हटलं आहे की ,अमेरिकेच्या नऊ राज्यांमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामध्ये न्यू यॉर्क, न्यू जर्सी, डेलावेअर, वर्मोंट, मिशिगन, विस्कॉन्सिन, मिनेसोटा, नॉर्थ डकोटा आणि साउथ डकोटा यांचा समावेश आहे

स्ट्रेटसची 'ही' आहेत लक्षणं

- श्वास घेण्यास त्रास होणं किंवा छातीत जडपणा जाणवणं
- घसा खवखवणं 
- डोकेदुखी आणि अंगदुखी
- पोट खराब होणं किंवा भूक न लागणं
- मळमळ आणि उलट्या
- मानसिक थकवा, लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- चव आणि वासाची जाणीव कमी होणं

अशी घ्या आरोग्याची काळजी

- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीव्हायरल औषधं घ्या.
- कोमट पाणी पिणं, वाफ घेणं आणि हळदीचे दूध पिणं यासारखे घरगुती उपचाराने आराम मिळू शकतो.
- नीट विश्रांती घ्या, खूप दगदग किंवा जास्त काम करू नका.
- संतुलित आहार घेऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.

कोरोना व्हायरसचे व्हेरिएंट सतत येत असतात, परंतु सावधगिरी आणि सतर्कता हाच सर्वोत्तम उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं, हात धुणं, पोषक आहार घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे.
 

English
हिंदी सारांश
Web Title : New COVID Strain Sparks Global Worry; Watch Out for These Symptoms

Web Summary : A new COVID variant, XFG or 'Straetus,' is spreading globally, causing concern. Symptoms include breathing issues, sore throat, and fatigue. Experts advise precautions like masking, handwashing, and a healthy diet. Early detection and care are crucial to combat the spread.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स