नव्याने संक्रमित झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहे 'ही' न्युरोनॉजिकल लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 02:54 PM2020-07-16T14:54:07+5:302020-07-16T15:08:17+5:30

CoronaVirus News & Latest Udates : कोरोना व्हायरस डोक्याच्या आणि मेंदूच्या नसांवरही आक्रमण करतो.

Neurological symptoms are seen in newly infected corona patients | नव्याने संक्रमित झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहे 'ही' न्युरोनॉजिकल लक्षणं

नव्याने संक्रमित झालेल्या कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहे 'ही' न्युरोनॉजिकल लक्षणं

Next

देशभरात कोरोना व्हायरसचा रोज नवीन रेकॉर्ड समोर येत आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांबाबत डॉक्टरांकडून नवनवीन माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार खोकला, घश्यातील वेदना, श्वास घ्यायला त्रास होण ही  कोरोनाची लक्षणं आहेत. माय उपचारशी बोलताना डॉ. अजय मोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस मुख्य स्वरुपात पचनतंत्र खराब करतो. त्यानंतर नाक आणि घश्यात परिणाम दिसून येतात. 

कोरोना व्हायरस हा श्वसनतंत्रावर आणि फुफ्फुसांवर परिणाम करतो. हे जरी खरे असले तरी  अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आले की कोरोना व्हायरस डोक्याच्या आणि मेंदूच्या नसांवरही आक्रमण करतो. त्यामुळे न्युरोलॉजिकल समस्या उद्भवतात. त्यामुळे चक्कर येणं, डोकेदुखी यांसारख्या समस्या  जाणवतात. हे संशोधन चीनच्या वुहान शहरात करण्यात आले होते.

२१४ कोरोना रुग्णांची चाचणी करण्यात आली.त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना गंभीर न्यरोलॉजिकल समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यातील ३६ रुग्णांना चक्करे येणं, २८ रुग्णांना डोकेदुखी आणि १६ रुग्णांना बेशुद्ध होण्याची समस्या उद्भवत होती. तर एका रुग्णात अटॅक्सिया (गतिभंग) ची स्थिती उद्भवली होती.  एम्सचे डॉक्टर  के.एम नाधीर यांनी दिलेल्या माहितीनुासर अटॅक्सियाने पिडीत असलेल्या लोकांना शारीरिक हालचाली करण्यास त्रास होत होता. बोलताना त्रास होणं, डोळे दुखणं या समस्यांचा सामना करावा लागला. तर गंभीर स्थितीतील रुग्णांनी आपले संतुलन गमावले.

या संशोधनातून दिसून आले की कोरोना रुग्णांनी आपली वास घेण्यााची आणि चव ओळखण्याची क्षमता गमावली होती. दरम्यान अनेक तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार वास न येणं आणि चव न समजणं कोरोना विषाणूंचे लक्षणं असू शकते. गंभीर संक्रमण झालेल्या रुग्णांमध्ये वयस्कर रुग्णांचा समावेश जास्त होता. उच्च रक्तदाब, ताप, खोकला आणि गंभीर समस्या असलेल्या  लोकांना न्युरोलोजिकल समस्यांचा सामना करावा लागत आहे.

त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

Web Title: Neurological symptoms are seen in newly infected corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.