CoronaVirus : coronavirus mystery 57 people test positive despite being in sea | कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार पसरवला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती दररोज समोर येत असून तज्ज्ञ कोरोनाच्या संक्रमणाबाबत लहानात लहान गोष्टींवर संशोधन करत आहेत. अमेरिका, ब्राझिल, भारत आणि रशिया या देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची लागण होण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३५ दिवसात समुद्रात राहत असलेल्या  ५७ लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. समुद्रात जाण्याआधी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. 

डेली मेलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार हे सगळे लोक एकाच कंपनीसाठी काम करणारे मासेमार आहेत. काही दिवसांपूर्वी अर्जेंटिनामधील मासेमारांमध्ये लक्षणं दिसून आली होती. तेव्हा त्यांना जहाजावर परत बोलावण्यात आले होते. अर्जेंटीनाचे आरोग्य अधिकारी या रहस्यमय प्रकारांचे मुळ समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कोरोना का रहस्यमय हमला, 35 दिन से अलग-थलग रह रहे 57 लोग पॉजिटिव

(प्रातिनिधिक फोटो)

अर्जेंटीनाचे  Tierra del Fuego तील आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार जहाजावर राहत असलेल्या ६१ पैकी ५७ लोक कोरोना पॉजिटिव्ह आले आहेत. त्यातील दोनजणांची चाचणी निगेटिव्ह आली असून दोन जणांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. या सगळ्यांना १४ दिवसांपर्यंत हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे. 

अर्जेंटीनाचे आरोग्य अधिकारी अलेजैंद्रा अल्फारो यांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांच्या संक्रमणाचं कारणं शोधणं कठीण आहे. कारण ३५ दिवसात हे लोक कोणाच्याही संपर्कात आले नव्हते. मासेमारांमध्ये दिसत असलेल्या लक्षणांचा क्रम कसा होता. याबाबत तपास केला जात आहे. जेणेकरून संक्रमणाच्या स्त्रोताबाबत माहिती मिळू शकेल. अर्जेंटिनामध्ये आतापर्यंत  कोरोना व्हायरसचे 1,06,910 केसेसे समोर आले आहेत. तर 1,968 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढत आहे. तसेच देशातील कोरोनाचा फैलाव आता केवळ काही राज्यांपुरता मर्यादित झाला आहे, कंटेन्मेंट झोनबाबत जो निर्णय घेण्यात आला तो यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे, असे केंद्र सरकारने सांगितले. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार ३ मे रोजी देशातील रिकव्हरी रेट २६.५९ टक्के होता. तर आता हा रिकव्हरी रेट ६३.०२ टक्के झाला आहे.

खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स 

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९ लाखांवर; पण 'या' ९ गोष्टी दिलासादायक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : coronavirus mystery 57 people test positive despite being in sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.