खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 06:36 PM2020-07-14T18:36:13+5:302020-07-14T18:37:45+5:30

माहामारीच्या काळात लोकांना आजारांपासून लांब ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. 

Health Tips : WHO guidelines for keeping food away from viruses and germs | खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स 

खाद्यपदार्थांना विषाणू आणि जंतूंपासून दूर ठेवण्यासाठी WHO ने सांगितल्या 'या' गाईडलाईन्स 

Next

(Image credit- Whtshot)

कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी वावरताना तसंच खाण्यापिण्याच्या बाबतीत काळजी घेणं गरजेचं आहे. वाढत्या कोरोनाच्या माहामारीत लहानात लहान चूकही माहागात पडू शकते. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे अनेकजण आपापल्या घरी जास्तीचे अन्नपदार्थ आणून ठेवत आहेत. त्यात कच्चे आणि शिजवलेले अशा दोन्ही प्रकारच्या अन्नपदार्थांचा समावेश आहे. पण आपल्या काही  चुकांमुळे अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यात असते. यागोष्टी लक्षात घेता माहामारीच्या काळात लोकांना आजारांपासून लांब ठेवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं काही गाईडलाईन्स दिल्या आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेनं एका व्हिडीओच्या माध्यमातून खाद्यपदार्थ व्हायरस आणि बॅक्टेरिया मुक्त कसे ठेवता येतील याबाबत सांगितले आहे. जे अन्न आपण फ्रिज किंवा इतर ठिकाणी साठवून ठेवतो त्या अन्नात प्रामुख्याने ३ प्रकारचे माइक्रोऑर्गेनिजम्स असतात.ज्यात बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसचा समावेश असतो. पहिल्या प्रकारातील मायक्रोऑर्गेनिजम्स आपल्या अन्नाला निरोगी आणि चविष्ट बनवतात, बॅक्टेरिया दूध आणि दही जमवत असलेल्या पदार्थात असतात. तर दुसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया अन्नाची चव खराब करतात. त्यामुळे जेवणााचा दुर्गध येतो. तर  तिसऱ्या प्रकारचे बॅक्टेरिया वासामुळे कळून येत नाहीत. 

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार या माइक्रोऑर्गेनिजमला  पैथोजेनिक माइक्रोऑर्गेनिजम असं म्हणतात. जर कोणत्याही व्यक्तीने अशा अन्नाचे सेवन केले तर पोटदुखी, अतिसार, अपचन, उलट्या, ताप यांसारख्या समस्या उद्भवतात. अनेकदा प्रदुषित अन्नाचे सेवन केल्यामुळे मृत्यूचाही सामना करावा लागतो.पॅथोजेनिक माइक्रोऑर्गेनिजम शरीरात वेगाने वाढून आपली संख्या वाढवतात. त्यामुळे आरोग्यांच्या समस्या जाणवतात. या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे

काही खाण्याआधी किंवा अन्नपदार्थांना स्पर्श करण्यासाठी हात स्वच्छ धुवा.

फ्रिजमध्ये उरलेले अन्न ठेवताना कच्च आणि शिजलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा. त्यामुळे किटाणू निर्माण होणार  नाहीत

जेवण बनवताना चांगले शिजवून मगच सेवन करा. अर्धवट शिजलेले अन्न शरीरासाठी घातक ठरू शकते.

योग्य तापमानात अन्न साठवून ठेवा. खाद्यपदार्थ विकत घेताना पाकिटावर लिहिलेला मजकून नीट वाचा. 

चांगल्या दर्जाच्या मसाल्यांचा वापर करा. 

धक्कादायक! लक्षणं नसलेल्या महिलेमुळे तब्बल ७१ लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह; पण कसे? 

खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार

Web Title: Health Tips : WHO guidelines for keeping food away from viruses and germs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.