धक्कादायक! लक्षणं नसलेल्या महिलेमुळे तब्बल ७१ लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह; पण कसे? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 04:30 PM2020-07-14T16:30:06+5:302020-07-14T16:32:25+5:30

प्रवासावरून परत आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले होते. त्यावेळी त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती. अपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर लिफ्टमध्येही ही महिला एकटी होती.

CoronaVirus News : Coronavirus asymptomatic woman infects 71 people | धक्कादायक! लक्षणं नसलेल्या महिलेमुळे तब्बल ७१ लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह; पण कसे? 

धक्कादायक! लक्षणं नसलेल्या महिलेमुळे तब्बल ७१ लोक झाले कोरोना पॉझिटिव्ह; पण कसे? 

Next

कोरोनी लक्षणं दिसत नसलेल्या एका महिलेने ७१ लोकांना कोरोना पॉजिटिव्ह केले आहे. या महिलेने स्वतः खूप काळजी घेतलेली असतानाही व्हायरसचा प्रसार झाला आहे. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल सीडीसीने या घटनेवर अभ्यास केला आहे. चीनच्या सीडीसीने दिलेल्या माहितीननुसार या महिलेनं सगळ्या गाईडलाईन्सचं पालन केलं होतं. प्रवासावरून परत आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले होते. त्यावेळी त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती. अपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर लिफ्टमध्येही ही महिला एकटी होती.

independent.co.uk ने दिलेल्या माहितीनुसार १९ मार्चला ही महिला अमेरिकेहून चीनला म्हणजेच के हेलोंगजिआंगमध्ये आपल्या घरी परत आली.  चाचणीदरम्यान कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही या महिलेला क्वारंटाईन राहण्यास सांगितले होते. या महिलेने लिफ्टचा वापर केल्यानंतर काही वेळाने शेजारच्या व्यक्तीने लिफ्टचा वापर केला होता. त्यानंतर शेजारच्या कुटुंबातील काही लोकांनी मिळून पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर २ एप्रिलला या पार्टीत समावेश असलेल्या एका महिलेला स्ट्रोकची समस्या उद्भवली. 

बिना लक्षण वाली एक महिला ने कैसे 71 लोगों को कर दिया कोरोना पॉजिटिव

पार्टीमध्ये समावेश असलेल्या लोकांचे आणि संक्रमणचं कोणतंही कनेक्शन दिसून आलं नाही. तज्ज्ञांना त्यानंतर दिसून आले की ज्या लिफ्टमध्ये अमेरिकेतून आलेल्या महिलेने प्रवेश केला होता. त्याच लिफ्टचा वापर केल्यामुळे शेजाऱ्यांना संक्रमणाचा सामना करावा लागला. त्यानंतर स्ट्रोकची समस्या उद्भवलेली महिला रुग्णालयात गेली असता त्याचवेळी २८ लोकांना नकळतपणे संक्रमित केले. दुसऱ्या दिवशी वेगळ्या रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा अन्य २० व्यक्तींकडे संक्रमण पसरलं.

त्यानंतर डॉक्टरांनी अमेरिकेतून आलेल्या महिलेची पुन्हा चाचणी केली. सुरूवातीला या महिलेची चाचणी निगेटिव्ह आली होती. पण आता मात्र या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. म्हणजेच या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. पण लक्षणं दिसून येत नव्हती. तज्ज्ञांनी या अभ्यासावरून निष्कर्ष काढला की लक्षणं दिसत नसलेल्या महिलेच्या संपर्कात आल्याने शेजारी आणि लिफ्टच्या संपर्कात आलेले लोक कोरोना पॉजिटिव्ह झाले. यातून असं दिसून येते की लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णांपासून कोरोना विषाणू पसरण्याचा धोका जास्त असतो. 

खरचं चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला?; WHO ची टीम सत्य समोर आणणार

काळजी वाढली! खरंच लस दिल्याने कोरोनापासून बचाव होईल? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Web Title: CoronaVirus News : Coronavirus asymptomatic woman infects 71 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.