शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'हे' असू शकतं मुलांचं चिडचिड करण्याचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 15:37 IST

कोणत्याही पालकांसाठी आपल्या लहान मुलांचा राग शांत करणं सोपं काम नाहीये. खासकरुन जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असता तेव्हा मुलांना शांत करण्याचे पर्याय नसतात.

कोणत्याही पालकांसाठी आपल्या लहान मुलांचा राग शांत करणं सोपं काम नाहीये. खासकरुन जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असता तेव्हा मुलांना शांत करण्याचे पर्याय नसतात. अशावेळी अनेक पालक हे आपल्या मुलांवर चिडतात. पण अशाप्रकारे चिडून मुलं शांत होत नाहीत. उलट ते आणखी जास्त आरडाओरड करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, मुलं असं का करतात? खरं तर चिडचिड करण्याची अनेक कारण असू शकतात.

तुमची मुलं सतत चिडचिड करतात का? किंवा ती सतत आक्रमक होत असतील तर यामागील सर्वात मोठं कारण साखर असू शकते. गोंधळलात का? जास्त प्रमाणात साखरेचं सेवन केल्यामुळे तुमचं मुल आक्रमक आणि रागीट होऊ शकतं. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. संशोधनात सांगितल्यानुसार, ज्या मुलांच्या आहारात साखरेचं प्रमाण अधिक असतं किंवा जी मुलं सर्वात जास्त साखर खातात, ती अधिक हिंसक, अल्कोहॉलिक आणि सिगरेट पिण्यास जास्त प्रवृत्त होतात. हे संशोधन जर्नल सोशल सायन्स अॅन्ड मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.  अनेक संशोधनांचे विश्लेषण केल्यानंतर असं समोर आलं की, जास्त साखर खाल्याने किंवा साखरेचं प्रमाण जास्त असलेलं पेय प्यायल्याने 11 ते 15 वर्षांच्या मुलांमध्ये हिंसकवृती वाढते. संशोधनानुसार, जर एखादं मुल जास्त मिठाई किंवा एनर्जी ड्रिंक घेत असेल तर त्याचं असं करणं दुसऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतं. तेच दुसऱ्या एका संशोधनातून सांगितले की, लहान मुलांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांची भांडणामध्ये पडण्याची शक्यता वाढवतं. त्यामुळे 95 टक्के मुलं नशेच्या आहारी जातात. 

संशोधकांचं असं म्हणणं आहे की, एनर्जी ड्रिंक, चॉकलेट आणि मिठाईचे अधिक सेवन केल्यामुळे मुलांच्या वागण्यावर वाईट परिणाम होतो. कारण यामध्ये कॅफेन अधिक असतं. इस्रायलमधील बार इलन युनिवर्सिटीने 137,284 मुलांवर अभ्यास केला. ज्यामध्ये 11, 13 किंवा 15 वर्षांच्या मुलांचा समावेश केला होता. यामध्ये असं आढळून आलं की, मुलांच्या वागण्याचा त्यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाशी घनिष्ट संबंध आहे. 

नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लडच्या गाइडलाइन्सनुसार, 11 वर्षांची मुलं 30 ग्रामपेक्षा जास्त साखर खात नाहीत. कोकाकोलाच्या एका कॅनमध्ये 35 ग्रॅम साखर असते. 4 ते 6 वर्षांच्या मुलांना दिवसभरासाठी 19 ग्राम साखर देणं शक्यतो टाळावं. 

संशोधकांनी सांगितले की, मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे त्यांना मोठे झाल्यावर कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो याचा अंदाज येतो. अभ्यासानुसार, अधिकाधिक प्रकरणांमध्ये मुलांच्या आहारातील साखरेचे प्रमाण आणि त्यांचं वागणं यामध्ये त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या वागण्याचा फरक पडत नाही. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहारrelationshipरिलेशनशिपParenting Tipsपालकत्व