शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एका दिवसात किती कॉफी प्यायला हवी?; जास्त प्यायल्याने होऊ शकतं शरीराचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 16:12 IST

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम कॉफीने होते. पण कॉफीचं अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही गरमागरम कॉफीने होते. पण कॉफीचं अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त कॉफी प्यायल्याने चिंता, निद्रानाश, हाय ब्लड प्रेशर यासारख्या अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

कॉफीमध्ये कॅफीन नावाचा पदार्थ असतो जे मेंदूला सक्रिय करतो आणि एकाग्रता आणि ऊर्जा पातळी वाढवतो.एका दिवसात किती कॉफी पिणं हे किती चांगलं आहे? आणि जास्त कॉफी प्यायल्याने तुमच्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकतात? याबाबत जाणून घेऊया...

कॉफी पिण्याचे जसे फायदे आहेत. तसेच काही तोटे देखील आहेत. दररोज ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचं सेवन करू नये असं म्हणतात. यामुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

कॉफी पिण्याचे फायदे

मेंदूचं आरोग्य अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कॉफी पिण्याने मेंदूचं आरोग्य सुधारतं आणि अल्झायमर आणि पार्किन्सनसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

मधुमेहाचा कमी धोकाकाही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कॉफी प्यायल्याने टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यास मदत कॉफी चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

नैराश्याचा धोका कमीकाही अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कॉफी प्यायल्याने नैराश्याचा धोका कमी होतो.

जास्त कॉफी पिण्याचे तोटे

- कॅफिन हे एक उत्तेजक आहे जे झोपेमध्ये व्यत्यय आणू शकतं.- जास्त कॅफीन चिंता आणि अस्वस्थता वाढवू शकतं.- जास्त कॉफीमुळे अपचन होऊ शकतं.- कॅफिनमुळे हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर वाढू शकतं.- गर्भवती महिलांनी कॉफी कमी प्यायली पाहिजे, यामुळे त्रास होऊ शकतो.

तज्ञांचा सल्ला

तज्ञांनी असं सुचवलं आहे की दररोज ४०० मिलीग्रामपेक्षा जास्त कॅफिनचं सेवन करू नये. हे जवळपास चार कप कॉफीच्या बरोबर आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स