शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरी बसून वाढलेला कमरेचा आणि  पोटाचा घेर झटपट होईल कमी; फक्त 'हे' ४ उपाय वापरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 20:10 IST

वजन जास्त प्रमाणात वाढले नसेल तरी कमरेचा भाग, पोट, दंड या अवयवांमध्ये फॅट्स वाढतात आणि शरीराचा आकार बेढब दिसतो.  आज आम्ही तुम्हाला घरबसल्या वजन कमी करण्याचे सोपे उपाय सांगणार आहोत.

दैनंदिन जीवनात वजन वाढण्याची समस्या अनेकांना उद्भवते. यावर्षी कोरोनाच्या माहामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने २ ते ३ महिने घरी बसून राहिल्यानं अनेकांना वजन वाढण्याची समस्या उद्भवत आहे. वजन  जास्त प्रमाणात वाढले नसेल तरी कमरेचा भाग, पोट, दंड या अवयवांमध्ये फॅट्स वाढतात आणि शरीराचा आकार बेढब दिसतो.  आज आम्ही तुम्हाला घरबसल्या वजन कमी करण्याचे सोपा उपाय सांगणार आहोत. सध्या जीमसुद्धा पूर्णपणे उघडेल्या नाहीत. जीम सुरू झाल्यातरी अनेकजण जीमला जाण टाळतील कारण कोरोना संसर्गाची भीती अनेकांच्या मनात अजूनही आहे. 

जास्तीत जास्त पाणी प्या

शरीराला पाण्याची खूप गरज असते. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीर डिहायड्रेट होतं. जास्त पाणी प्यायल्यामुळे त्वचा चांगली  राहते.  दिवसभरातून आठ ते दहा ग्लास पाणी प्या. त्यामुळे पोटावरची चरबी कमी करता येते.  अतिरिक्त फॅट्स बर्न करण्यासाठी पाणी पिणं फायदेशीर ठरेल.

जास्त गोड खाऊ नका

लॉकडाऊनमध्ये घरी असल्यामुळे उर्जेचा वापर फारसा केला जात नाही. म्हणून जास्त कॅलरीज असलेले गोड पदार्थ खाणं टाळा.  काहीजण गोड पदार्थ आवडतात. म्हणून प्रमाणाचा काहीच विचार न करता नेहमीच आणि खूप प्रमाणात खातात. परंतु गोड पदार्थ पौष्टिक असले तरी, पचायला जड असतात आणि पचनशक्तीवर विशेष ताण देणारे असतात.

त्यामुळे  गोड पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ले तरच उपयोगी पडतात अन्यथा नुकसान देतात. प्रमाणाबाहेर गोड पदार्थ खाल्ल्यानं वजन खूप वाढतं. शरीरात अवास्तव प्रमाणात मेद किंवा चरबी निर्माण होते. लवकर थकवा येणं, अतिप्रमाणात घाम येणं, मेदाचे इतर आजार जसे की मधुमेह, विविध प्रकारच्या गाठी निर्माण होण्याची शक्यता वाढते.

थोड्या थोड्या वेळानं खा

वजन कमी करण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्हाला भूक लागेल तेव्हा एकाचवेळी जास्त न खाता थोड्या थोड्या वेळाने खात राहा.  जर तुमचे वजन कमी होत नसेल तर तुमच्या झोपेच्या वेळा चुकीच्या असू शकतात.जर तुम्ही सकाळी उशीरा उठत असाल तर, वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायला हवं.

व्यायाम करा

व्यायाम केल्यानंतर पुरेशी झोप घेणं सुद्धा आवश्यक असतं. लॉकडाऊनमुळे तुम्ही शरीराला आराम सद्धा देऊ शकता. सकाळी लवकर उठून गरम पाणी प्या. आणि नाश्ता करताना शरीरास पौष्टिक असणारे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. आणि व्यायाम न चुकता दररोज करा. रोज स्वतःसाठी २० ते ३० मिनिटं वेळ देऊन तुम्ही शरीर निरोगी ठेवू शकता. 

हे पण वाचा

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

CoronaVaccine : सीरम इन्स्टिट्यूटसोबत बिल गेट्स यांचा मोठा करार; 10 कोटी डोस गरिबांना देणार

मोठा दिलासा! सीरम इन्स्टिट्यूटनं जाहीर केली लसीची किंमत, फक्त २२५ रुपयांत मिळणार कोरोना लस

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य