शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

कोल्ह्याला द्राक्ष भलेही आंबट असतील पण आपल्या पाचनतंत्रासाठी द्राक्ष ही आरोग्यवर्धकच-संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 16:00 IST

यूसीएलए (UCLA) म्हणजेच कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस च्या नवीन अभ्यासानुसार, एक असे फळ आहे, जे आतड्याच्या आरोग्यासाठी प्रभावी मानले गेले आहे.

सध्याचे आयुर्वेदिक तज्ज्ञ बऱ्याच काळापासून पचनसंस्थेची स्थिती (Digestive System) आपल्या एकूण आरोग्यावर कसा परिणाम करते हे सांगत आहेत. जगभरातील अभ्यास आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी हा दावा सिद्ध केला आहे. जोपर्यंत त्याच्या जीवाणूंची पातळी बिघडत नाही तोपर्यंत, आतड्याचे आरोग्य (Gut Health) एकूण आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.

तंदुरुस्ती असो, पाचक आरोग्य असो किंवा जळजळ होण्याचा धोका असो, आतड्याची (Gut) स्थिती मेंदूशी संवाद साधते, ज्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम होतो.आतड्यातील जीवाणूंच्या असंतुलनामुळे (Gut bacteria imbalance) पोट आणि आतड्यांमध्ये देखील वेदना जाणवण्याची शक्यता असते.

आहारतज्ज्ञ आणि पोषण तज्ज्ञ (Dietitian and Nutritionist) स्ट्रेस लेव्हल मॅनेज करण्यावर, नियमितपणे व्यायाम करण्यावर आणि आतड्यांचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहाराचे पालन करण्यावर भर देतात. तर आता, यूसीएलए (UCLA) म्हणजेच कॅलिफोर्निया विद्यापीठ लॉस एंजेलिस च्या नवीन अभ्यासानुसार, एक असे फळ आहे, जे आतड्याच्या आरोग्यासाठी प्रभावी मानले गेले आहे.

फायबर युक्त अन्न हे आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे वारंवार सांगितले गेले आहे. हेल्थ जर्नल न्यूट्रिएंट्स मध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार, तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे की, एक विशिष्ट फळ आहे, ज्याचा पित्त, अ‍ॅसिड पातळी, कोलेस्ट्रॉल आणि आतड्यांवरील मायक्रोबायोम वर सकारात्मक प्रभाव पडतो. युसीएलएच्या नवीन अभ्यासानुसार, द्राक्ष हे कोलन हेल्थ (Colon Health , केमोथेरपीच्या लक्षणांचा सामना करणे आणि एकूणच आतड्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

असा झाला अभ्यासया अभ्यासासाठी, तज्ज्ञांनी चार आठवड्याच्या कालावधीत सहभागींच्या आरोग्यावर द्राक्षांचा कसा प्रभाव होतो, याची तपासणी केली. सहभागींनी दररोज द्राक्षाचे दोन सर्व्हिंग (४६ ग्रॅम) खाण्यासाठी देण्यात आले. चार आठवड्यांनंतर, तज्ज्ञांना सहभागींच्या एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलच्या पातळीत ५.९ टक्के घट आणि आतड्याच्या मायक्रोबायोममध्ये सुधारणा दिसून आली. आतड्याच्या आरोग्यासाठी द्राक्षाचे फायदे त्यांच्या उच्च फायबर सामग्री आणि कॅटेचिन - फायटोकेमिकल्समुळे दिसून येतात. जे शरीरात जीवाणूंमध्ये संतुलन निर्माण करतात.

शरीरावर कसा होतो परिणाम ?युसीएलएने स्पष्ट केल्याप्रमाणे आतड्यातील मायक्रोबायोममधील बदल हे मेटाबॉलिज्म संबंधी विकार, हृदयरोग आणि लठ्ठपणाच्या वाढीव जोखमीशी संबंधित आहेत. तसेच इरिटेबल बोवेल सिंड्रोम आणि ओटीपोटात दुखणे आणि अस्वस्थता देखील वाढू शकते. वैकल्पिकरित्या, निरोगी आतड्यासह रोगप्रतिकार प्रणाली अधिक सुरळीतपणे कार्य करू शकते आणि रोगाचा धोका कमी करू शकते.

संपूर्ण द्राक्षं तसेच अगदी द्राक्षाची पावडर आतड्यांतील मायक्रोबायोम आणि आरोग्यासाठी कशी फायदेशीर ठरू शकतं, यावर देखील या अभ्यासातून प्रकाश टाकण्यात आला आहे. द्राक्षे संपूर्ण शरीरासाठी कसे फायदेशीर ठरू शकतात, यावर अधिक संशोधनाची गरज असली तरी, असे म्हणता येईल, स्वादिष्ट फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षांचा आस्वाद कोणीही आनंदाने घेऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfruitsफळे