फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:55 IST2026-05-06T17:54:07+5:302026-05-06T17:55:20+5:30

दोन्ही दुधांमधील मुख्य फरक फॅट आणि कॅलरीजचा आहे. फुल क्रीम दूध ऊर्जादायी असते. तर टोंड दूध पातळ आणि हलके असते. फिट राहण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी टोंड दूध निवडावे. याउलट, शरीराला अधिक शक्तीसाठी फुल क्रीम दूध योग्य ठरेल. 

Full cream or toned milk Which milk is better for your health Know the difference | फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या

फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या

दूध हा साधारणपणे सर्वांच्याच दैनंदिन आहारातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक बनला आहे. मात्र, दुकानावर 'फुल क्रीम' आणि 'टोंड' अशा विविध प्रकारच्या बॅग बघून ग्राहकांचाही अनेकदा गोंधळ उडतो. तर, जाणून घेऊयात, या दोन्ही प्रकारच्या दुधामध्ये नेमका फरक काय? आणि आपल्यासाठी कोणते दूध अधिक चांगले? 

फुल क्रीम दूध -
फुल क्रीम दूध हे नैसर्गिक स्वरूपात असते, त्यात फॅटचे प्रमाण अधिक असते. यात ६ टक्क्यांपर्यंत फॅट असू शकते. यामुळे हे दूध घट्ट आणि मलाईदार असते. या दुधापासून बनवलेले दही, तूप आणि मिठाई अधिक स्वादिष्ट बनते. या दुधापासून अधिक ऊर्जा मिळते. यामुळे, वाढत्या वयाची मुले, खेळाडू अथवा शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी हे दूध उत्तम अथवा अधिक ऊर्जा देणार आहे. याशिवाय, या दुधात कॅलरीज अधिक असल्याने वजन वाढण्याची अथवा कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होण्याची शक्यताही असते. त्यामुळे याचा उपयोग प्रमाणात करणेही आवश्यक आहे. 

टोंड दूध - 
टोंड दूध तयार करताना फुल क्रीम दुधामध्ये स्किम्ड मिल्क आणि पाणी मिसळले जाते आणि त्यातील फॅटचे प्रमाण कमी केले जाते. या प्रक्रियेमुळे दूध हलके होते. मात्र, असे झाले तरी, त्यातील प्रथिने आणि कॅल्शियम सारखे महत्वाचे घटक कायम राहतात. हे दूध पचायला सहज आणि कमी कॅलरीजचे असल्याने वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय आहे.

अशी करा निवड - 
दोन्ही दुधांमधील मुख्य फरक फॅट आणि कॅलरीजचा आहे. फुल क्रीम दूध ऊर्जादायी असते. तर टोंड दूध पातळ आणि हलके असते. फिट राहण्यासाठी अथवा वजन कमी करण्यासाठी टोंड दूध निवडावे. याउलट, शरीराला अधिक शक्तीसाठी फुल क्रीम दूध योग्य ठरेल. 

 

Web Title: Full cream or toned milk Which milk is better for your health Know the difference