शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भय इथले संपत नाही! 'या' देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 13:10 IST

CoronaVirus News & latest Updates : फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. 

कोरोना व्हायरसने गेल्या अनेक महिन्यापासून थैमान घातलं आहे. आता हळूहळू कोरोनाचा प्रसार कमी होत आहे. तर अनेक ठिकाणी रुग्णांची आणि कोरोनामुळे होत असलेल्या मृतांची संख्याही कमी झालेली आढळून आली आहे. तर काही देशांमध्ये कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहे. फ्रान्समध्ये आता कोरोनाची दुसरी लाट पसरायला सुरूवात झाली आहे. या लाटेचा फटका जास्तीत जास्त लोकसंख्येला बसू नये यासाठी फ्रेंच सरकारने देशात आणीबाणी लागू केली आहे. फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा आरोग्य आणीबाणी लागू करण्यात आली आहे. 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ही आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या आपत्कालीन आणीबाणीमुळे फ्रेंच सरकारला कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर कठोर उपाययोजना करण्याचे अधिकारही असू शकतात. फ्रान्सने याआधीही कोरोनाचा वाढणारा प्रसार  रोखण्यासाठी आणीबाणी जाहीर केली होती.  त्याअंतर्गत सरकारने कोरोना संक्रमणाविरूद्ध लोकांवर कडक निर्बंध घातले होते. यादरम्यान लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मार्चमध्ये  सुरू झालेली ही आणीबाणी जवळपास 10 जुलैपर्यंत होती. 

बुधवारी माध्यमांना मुलाखत देताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, ''सध्याच्या स्थितीत कोरोनाला रोखण्यासाठी कठोर पावले उचलणे अनिवार्य आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले पाहिजेत.'' याशिवाय पॅरिसमध्ये आणि कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या ठिकाणी रात्रीच्या वेळी कर्फ्यूची घोषणा केली आहे. मॅक्रॉन यांनी शनिवारपासून 9 शहरांमधील रहिवासीयांना रात्री 9 ते पहाटे 4 या वेळेत त्यांच्या घरी रहावे, असे आवाहन केले आहे. CoronaVirus  : हिवाळ्यात कोरोना विषाणूचा धोका वाढणार? सुपर कम्प्यूटरने केला खुलासा

पुढे त्यांनी सांगितले की, '' सावधगिरी म्हणून कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ले-डे-फ्रान्स प्रदेश तसेच लिल, ग्रेनोबल, लियोन, मार्सिले, रुएन, सेंट एटिने, माँटपेलियर आणि टूलूझ या शहरामध्ये कर्फ्यू लागू होईल, यावर त्यांनी भर दिला. दरम्यान, बुधवारी फ्रान्समध्ये कोरोनाचे 22,951 नवीन रुग्ण आढळले. फ्रान्समध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 32 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संक्रमितांची संख्या 7 लाख 56 हजार 472 आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा होणार? महाराष्ट्रातील 'या' शहरात Reinfection चे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFranceफ्रान्स