शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अरे व्वा! अँटी कोरोना औषध २ ते ३ दिवसात बाजारात उपलब्ध होणार; DRDO अध्यक्षांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 16:33 IST

DRDO invented a medicine : पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांना हे औषध मिळायला सुरूवात होईल. हे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध होणार आहे. जूनपर्यंत सगळ्या रुग्णांना हे औषध उपलब्ध होणार आहे. 

कोरोनाची लढाई  जिंकण्यासाठी अनुसंधान आणि विकास संगठन (डीआरडीओ) चे नवीन औषध काही दिवसातच बाजारात येण्याची शक्यता आहे. या औषधावर रिसर्च करत असलेल्या टिमचे मुख्य वैज्ञानिक डॉ. अनंत नारायण भट्ट यांनी सांगितले की, ''पुढच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांना हे औषध मिळायला सुरूवात होईल. हे औषध पावडर स्वरूपात उपलब्ध होणार आहे. जूनपर्यंत सगळ्या रुग्णांना हे औषध उपलब्ध होणार आहे. ''

डीआरडीओच्या रिसर्च लॅब इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर अँड अलाइड सायन्सेस (आयएनएमएएस) चे वैज्ञानिक डॉ. भट्ट म्हणाले की, ''ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) च्या मान्यतेनंतर डॉ. रेड्डीच्या प्रयोगशाळेने त्याच्या निर्मितीवर मोठ्या प्रमाणात काम केले आहे.

हे औषध विशेषत: अशा रुग्णांना फायदा करेल जे व्हेंटिलेटरवर किंवा ऑक्सिजनसह आहेत. असे रुग्ण लवकरच बरे होऊ शकतात. या औषधाचे उत्पादन वेगानं सुरू असून जूनपासून या औषधाचे 50 हजार ते एक लाख डोस दररोज लोकांना उपलब्ध करून दिले जातील.''

असे आहे नव्या औषधाचे स्वरूप

डीआरडीओचे २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) हे कोरोनावरील नवे औषध पावडर स्वरुपात असून रुग्णाने ते पाण्यात मिसळून घ्यायचे आहे. कोरोनामुळे कोणत्या पेशी बाधित झाल्या आहेत याची ओळख हे औषध पटविते व त्या पेशींचे कार्य सुधारते. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणूला रोखण्याचे काम करते. देशात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना हे गुणकारी औषध त्यांच्यासाठी वरदान ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

४२% रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज नाही

या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स