शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

व्यायामानंतर चुकुनही खाऊ नका हे पदार्थ; उलट वजन वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 8:23 PM

रोज तुम्ही वर्कआऊट करण्यासाठी तासन् तास घालवता. मग इतकं सगळं करून व्यायामनंतर चूकीचे पदार्थ खाऊन ते वाया का घालवता.

वजन घटवण्यासाठी तुम्ही डाएटिशिअनने दिलेले डाएट अगदी तंतोतंत पाळता. काय खावे? काय खाऊ नये? याचे पथ्यही तुम्ही नियमित पाळता. अगदी कितीही खावेसे वाटले तरी काही पदार्थ खाण्यासाठी तुम्ही तुमच्या तोंडावर नियंत्रण ठेवता. त्यातच महत्वाची बाब म्हणजे व्यायाम. रोज तुम्ही वर्कआऊट करण्यासाठी तासन् तास घालवता. मग इतकं सगळं करून व्यायामनंतर चूकीचे पदार्थ खाऊन ते वाया का घालवता. तुम्हाला माहितही नसेल की काही पदार्थ तुम्ही व्यायामानंतर खाऊन वजन कमी करण्याऐवजी वाढवता...

केळं केळ्यामध्ये फार मोठ्याप्रमाणावर कॅलरी आणि कार्बोहायट्रेड असतात. वजन कमी करताना केळं न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यातही तुम्ही व्यायाम करण्यापुर्वी केळं खाल्ल्यास जितका परिणाम होत नाही. त्यापेक्षा जास्त परिणाम व्यायाम केल्यानंतर केळं खाल्ल्यामुळे होतो. यामुळे आपल्या शरीरात असलेले फॅट बर्न  होत नाहीत.

खजूरखजुरात विविध पोषणद्रव्ये असतात जी, आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात. खजुर खाल्ल्याने आपल्या शरीरातील उर्जेत वाढ होते. पण मंडळींनो खजुरातही कॅलरीज जास्त असल्याने शरीरातील फॅट बर्न करण्याची प्रक्रिया संथ होते.

आंबाउन्हाळ्यात आंबा न खाणे म्हणजे जणू काही या पदार्थावर आणि परीने आपल्या जीभेवर केलेला जणू अन्यायच पण जर आंबा तुम्ही व्यायामानंतर खात असाल तर तो तुमच्या आरोग्यावरील अन्याय ठरेल. भरपूर लोकांना आंबा फार आवडतो. पण यात कॅलरीज आणि कार्ब मोठ्याप्रमाणावर असतात. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर आंबा खाऊ नका.

खोबरंनारळाचं खोबरं म्हणजे कोकणी लोकांच्या जेवणातील महत्वाचा भाग आहे. पण जर नारळाचं खोबरं व्यायाम केल्यानंतर खाल्ल्यावर उलट वजन आणखी वाढतं.

अंजीरअंजीर खाणे हे आपल्या शरिरासाठी लाभदायक असते. अंजीरात कॅलरीजही कमी असतात. सुकवलेले अंजीरही मोठ्याप्रमाणात खाल्ले जातात. पण तरीही अंजीर व्यायामानंतर खाऊ नये असे डॉक्टर मंडळी सांगतात.

मनुकाकार्बोहायट्रेड्स युक्त मनुका आपल्या जेवणात जरूर असल्या पाहिजेत  पण व्यायामानंतर मनुका खाणे टाळावे. कारण यामुळे वजन वाढू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्न