शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: सर्दी-खोकल्यापेक्षाही घातक आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 07:01 IST

कुठल्या ही नव्या आजाराची साथ येते तेव्हा साथीच्या सुरुवातीच्या काळात जास्त मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठी सतर्कता व हा आजार टाळण्यासाठीचे प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे असतात.

अमोल अन्नदाते

कोरोना हा साध्या सर्दी-खोकल्यासारखा आजार असल्याचा घातक प्रचार समाज माध्यमांवर सुरू आहे. कोरोना हा माध्यमे, वैद्यकीय क्षेत्र, फार्मा कंपन्यांनी तयार केलेला बागुलबुवा आहे, त्याची फारशी दखल घेण्याची गरज नाही, असे सांगणारे एक गीत समाज माध्यमांवर सक्रिय आहे. हे सगळे गैरसमज आहेत. कोरोना हा सर्दी, खोकल्यासारखा नव्हे तर त्या पेक्षा नक्कीच जास्त घातक व दखलपात्र आहे. यासाठी काही गोष्टी समजून घ्या.

१. सर्दी, खोकला हा आधी अस्त्विात असलेल्या कोरोनामुळे ही होतो पण कोविड-१९ या नव्या विषाणूचा जागतिक व देशातील मृत्यूदर सर्दी, खोकल्यापेक्षा जास्त आहे.२. कोविड-१९ हा नवीन विषाणू असल्याने अजून त्याच्या विरोधात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही व ती कशी असेल, अशी प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही हे अजून माहित नाही. पण नियमित सर्दी खोकल्याचे तसे नाही.३. कोविड-१९ ची इतरांना संसर्ग करण्याची क्षमता ही साध्या सर्दी, खोकल्यापेक्षा खूप जास्त आहे. म्हणून एका कोरोनाबाधितांकडून मोठ्या संख्येने लोक संसर्गित होतात.४. सध्या सर्दी खोकल्याचा फुप्फुस, हृदय व किडनीवर विशेष परिणाम होऊन प्राणघातक स्थिती निर्माण होत नाही. पण कोविड-१९ मध्ये मात्र हे होऊ शकते.५. ज्यांना इतर काही दीर्घकालीन आजार आहे, त्यांना साध्या सर्दी खोकल्यामुळे जीवाला धोका संभवत नाही पण अशांना कोरोनामुळे मात्र धोका संभवतो. अशा दीर्घकालीन आजार असणाऱ्यांची संख्या देशात प्रचंड आहे व त्यांच्या जीवाला धोका असल्याने कोविड-१९ नक्कीच दखलपात्र आहे.कुठल्या ही नव्या आजाराची साथ येते तेव्हा साथीच्या सुरुवातीच्या काळात जास्त मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यासाठी सतर्कता व हा आजार टाळण्यासाठीचे प्रतिबंधक उपाय महत्त्वाचे असतात. म्हणूनच असे संदेश किंवा कोरोना हा काहीही नसून बागुलबुवा, षडयंत्र असल्याच्या पोस्ट समाजमाध्यमांवर फॉरवर्ड करू नये व आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली सर्व काळजी घ्यावी.(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या