शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

खाजेवरचं 'आयव्हरमॅक्टिन' हे औषध कोरोनाचं संक्रमण नष्ट करण्यासाठी प्रभावी, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 4:33 PM

CoronaVirus News & Latest Updates : या औषधानं कोरोनापासून बचाव आणि  रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात असा दावा केला जात आहे.

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे भारतासह संपूर्ण जगभरातील देशांमध्ये हाहाकार पसरला आहे. कोरोना विषाणूंच्या उपचारांसाठी गंभीर आजारात वापरात असलेल्या आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. कोरोना विषाणूंच्या संक्रमणाचा सामना करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. दरम्यान उत्तरप्रदेश सरकारने खाजेसाठी वापरात असलेल्या औषधानं कोरोना रुग्णांचे उपचार करण्यास परवागनी दिली आहे.

या औषधानं कोरोनापासून बचाव आणि  रुग्णांचे उपचार केले जाऊ शकतात असा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेशच्याआरोग्य विभागाला कोरोना विषाणूंपासून रुग्णांना वाचवण्यासाठी हे औषध देण्याचे आदेश  दिले आहेत. या औषधाचे नाव आयव्हरमॅक्टिन आहे. या औषधाचा वापर  खाज येणे, त्वचेवर चट्टे येणं , पॅरासाईट्स इन्फेक्शन यासाठी केला  जातो.

या व्यतिरिक्त रिवर ब्लाइंडनेस, पोटातील जंतू मारण्यासाठी या औषधाचा वापर केला जातो.  तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आयव्हरमॅक्टीन हे औषध कोरोना संक्रमण रोखण्यासाठी परिणामकारक ठरत आहेत. तसंच  हे औषध व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखते. त्यामुळे व्हायरस संक्रमित रुग्णांच्या डीएनएशी मिळून आपली संख्या वाढवू शकत नाही. 

अमर उजालाने दिलेल्या माहितीनुसार लक्षणं नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती झाल्यानंतर सुरूवातीचे तीन दिवस रात्री जेवल्यानंतर दोन तासांनी आयव्हरमॅक्टीन गोळी दिली जाणारआहे. त्यासोबतच डाक्सीसाइक्लीन हे औषधही पाच दिवसांपर्यंत रोज दोनवेळा दिलं जाणार आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना हे औषध देण्यात येणार आहे.

संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण होण्यापासून बचावासाठी पहिल्या आणि सातव्या दिवशी  जेवणानंतर दोन तासांनी हे औषधं दिलं जाणार आहे. पहिल्या सातव्या आणि तिसाव्या दिवशी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना हे औषध  दिलं जाणार आहे. त्यानंतरच्या महिन्यातही हा क्रम सुरू ठेवण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाच्या बायोमेडिसिन डिस्कवरी इंस्टिट्यूटचे डॉं. कायली वागस्टाफ यांनी एप्रिलमध्ये केलेल्या दाव्यानुसार आयव्हरमॅक्टीन या औषधाने फक्त ४८ तासात कोरोना विषाणूंना नष्ट करता येऊ शकतं. फक्त २४ तासात हे औषध आपला परिणाम दाखवायला सुरूवात करतं. ऑस्ट्रेलियाच्या एंटीव्हायरल रिसर्च जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. 

हे पण वाचा :

२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या

अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या