Coronavirus: वैज्ञानिकांचा दावा! Chewing Gum खा अन् कोरोना टाळा; रिसर्चमधून आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 02:47 PM2021-12-01T14:47:02+5:302021-12-01T14:47:15+5:30

आता कोविडच्या धोक्यापासून वाचण्यासाठी एक्सपेरिमेंटल च्यूइंग गम(Chewing Gum) समोर आलं आहे

Coronavirus: Experimental Chewing Gum Can Trap Virus Particles And It May Help In Combatting COVID | Coronavirus: वैज्ञानिकांचा दावा! Chewing Gum खा अन् कोरोना टाळा; रिसर्चमधून आलं समोर

Coronavirus: वैज्ञानिकांचा दावा! Chewing Gum खा अन् कोरोना टाळा; रिसर्चमधून आलं समोर

Next

नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून जगासमोर कोरोना महामारीचं संकट उभं आहे. कोरोनाच्या नवनव्या व्हेरिएंटमुळे अनेकांची चिंता वाढली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहे. सध्या लसीकरण हा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एकमेव अस्त्र आहे. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगाने संक्रमित करत असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणं आहे. त्यामुळे बहुतांश देशांनी सतर्कता बाळगत परदेशी प्रवाशांवर निर्बंध आणण्यास सुरुवात केली आहे.

आता कोविडच्या धोक्यापासून वाचण्यासाठी एक्सपेरिमेंटल च्यूइंग गम(Chewing Gum) समोर आलं आहे. हे च्युइंग गम ९५ टक्के कोविड पार्टिकल्स मानवी तोंडातच ट्रॅप करतं ज्यामुळे हा आजार शरीरात पसरण्यापासून रोखण्यास मदत मिळते असा वैज्ञानिकांचा दावा आहे. एका स्टडीनुसार, हे च्युइंग गम एका नेटसारखं काम करते. त्यात कोरोना व्हायरसचे विषाणू ट्रॅप होतात. त्यामुळे Saliva व्हायरसच्या पसरण्याला मर्यादित करते. जेव्हा संक्रमित लोक बोलतात, श्वास घेतात आणि कफ करतात तेव्हा आजार पसरण्याचा धोका असतो मात्र हे च्युइंग गम या प्रसाराला रोखतं

व्हायरल लोड कमी करतं

स्पेशल च्यूइंग गममध्ये ACE2 Protein असतं. जे पेशीच्या पृष्ठभागापर्यंत जाते. विषाणू पेशींना संक्रमित करतो परंतु अलीकडेच केलेल्या प्रयोगात असं आढळलं की, जेव्हा विषाणूचे पार्टिकल्स च्युइंग गमच्या ACE2 ला मिसळतात तेव्हा व्हायरल लोड कमी होतो. जेव्हा या च्यूइंग गमच्या नमुन्याची चाचणी केली गेली तेव्हा यातील व्हायरल लोड जवळपास ९५ टक्के नष्ट झाला होता.

नेहमीच्या च्यूइंग गमसारखीच चव

University of Pennsylvania च्या रिसर्च टीमच्या मॉड्युलर थिअरीच्या रिपोर्टप्रमाणे, तुम्हाला या च्यूइंग गमची चव तुम्ही खाता त्या गमसारखीच येईल. सामान्य तापमानात हे च्यूइंग गम जास्त काळ साठवू शकता. हे च्यूइंग गम चघळल्यानं ACE2 प्रोटीन रेणूंना नुकसान होत नाही. याचा वापर लाळेतील व्हायरल लोड कमी करण्यासाठी होतो. लसीसोबतच हे च्यूइंग गम रुग्णांना फायदा पोहचवेल. ज्या देशात अद्याप लस उपलब्ध झाली नाही किंवा परवडणारी नाही त्याठिकाणी याचा जास्त फायदा होईल असं वैज्ञानिकांनी सांगितले आहे. परंतु हे च्यूइंग गम सध्या वापरासाठी उपलब्ध नाही परंतु स्टडीत दावा केला आहे की, संक्रमित लोकांमध्ये व्हायरस पसरण्यापासून हे रोखतं.

Read in English

Web Title: Coronavirus: Experimental Chewing Gum Can Trap Virus Particles And It May Help In Combatting COVID

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.