शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल, लॅपटॉपच्या रेडिएशनपासून सुरक्षित ठेवणारी एनवायरोचिप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 12:54 IST

मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो.

मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेटमधून निघणाऱ्या रेडिएशन म्हणजे इलेक्ट्रॉनिक लहरींमुळे व्यक्तीला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो, असं वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे. त्यामुळे यापासून कसा बचाव करता येईल याबाबत काही कंपन्या काम करत आहेत. त्यातीतल एका सायनर्जी एनवायरोनिक्स लिमिटेडने 'एनवायरोचिप' सादर केली आहे. या चिपने मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, वाय-फाय आणि टॅबलेट या उपकराणांमधून निघणाऱ्या हानिकारक इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनपासून सुरक्षा मिळणार आहे. 

इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशनसोबत सतत संपर्क येणे फार हानिकारक आहे. याचे दुष्परिणाम एकाएकी नाही तर कालांतराने हळूहळू दिसायला लागतात. कारण या रेडिएशनमुळे घर आणि ऑफिसमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवणाऱ्यांच्या आरोग्यावर वाइट प्रभाव पडतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO ने २०११ मध्ये मोबाइल रेडिएशनला कॅन्सरचं संभावित कारण मानलं आहे. मात्र आता तयार करण्यात आलेल्या एनवायरोचिपने या हानिकारक रेडिएशनचा प्रभाव बदलून लोकांचं आरोग्य सुरक्षित राहतं असं सांगितलं जात आहे. 

सायनर्जी एनवायरोनिक्स लिमिटेडचे निर्देशक प्रणव पोद्दार म्हणाले की, याने यंत्रांच्या वापराला विरोध नाहीये. तर यंत्रांमधून निघणाऱ्या हानिकारक लहरींना शुद्ध करतं. या चिपने यंत्रांची सिग्नल क्षमता किंवा त्यांची गुणवत्ता कमी केली जात नाही. तर एनवायरोचिप इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन्समधून उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही संभावित आरोग्यासंबंधी धोक्याला दूर केलं जातं. 

ते म्हणाले की, 'सध्या देशात आमचे १० लाख ग्राहक आहेत आणि ही संख्या वाढवण्याचा आमचा मानस आहे. भारत आणि परदेशातील मेडिकल-संशोधक संस्थांनी एनवायरोचिपवर खोलवर परिक्षण केलं आहे. ५०० पेक्षा अधिक लोकांवर करण्यात आलेल्या परिक्षणावरून समोर आलं आहे की, 'एनवोयरोचिप' च्या वापराने त्यांचा तणाव कमी झाला. 

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधनtechnologyतंत्रज्ञान