शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

लगेच दूर होईल मानेचा काळा रंग, घरीच करा हे 5 बेस्ट उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 4:03 PM

Black Neck : जर तुमच्या मानेचाही रंग काळा झाला असेल तर आम्ही काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. 

Black Neck  :चेहऱ्याची काळजी घेणं किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. कारण सगळ्यात आधी चेहरा दिसतो. पण बरेच लोक ज्या गोष्टी दिसत नाहीत त्यांची फारशी काळजी घेत नाहीत. जसे की, मान. लोक आपल्या मानेवर पूर्णपणे दुर्लक्ष करतात. याकारणाने मान दिवसेंदिवस काळी होत जाते. जर तुमच्या मानेचाही रंग काळा झाला असेल तर आम्ही काही खास टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. 

बेकिंग सोडा

दोन चमचे बेकिंग पावडर घ्या. त्यात पाणी मिश्रित करुन एक सेमी लक्विड तयार करा. हे मिश्रण काही वेळ मानेवर लावून ठेवा. त्यानंतर मान पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून काही दिवस हा उपाय केल्यास मानेचा काळेपणा दूर होण्यात मदत होईल.

कच्ची पपई

कच्ची पपई कापून त्याचे तुकडे करा. आता या तुकड्यांमध्ये गुलाबजल आणि एक चमचा दही टाकून मिश्रण तयार करा. ही पेस्ट मानेवर लावून काही वेळ सुकू द्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुम्हाला फरक दिसायला लागेल.

लिंबू आणि मध

लिंबू आणि मध एकत्र करुन एक पॅक तयार करा. हा पॅक काही वेळेसाठी मानेवर लावून ठेवा. आंघोळ करताना मान चांगली स्वच्छ करा. या उपायाने मानेचा काळेपणा आणि सुरकुत्याही दूर होती. 

लिंबू

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी हे तत्व असल्याने ते एका नैसर्गिक ब्लीचप्रमाणे काम करतं. आंघोळ करण्याआधी लिंबू मानेवर हलक्या हाताने घासा. आठवड्यातून दोन-तिनदा लिंबाचा असा वापर केल्यास फायदा होईल.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स