शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

"टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत.. " शेतकरी आत्महत्येवर भाषण देतांना बच्चू कडू कार्यकर्त्यांवर भडकले

By अंकुश गुंडावार | Updated: September 5, 2025 20:35 IST

ठाणा येथे शेतकरी हक्क यात्रा : सरकारवर डागली तोफ

गोंदिया : शेतकरी सभेत बच्चू कडू हे शेतकरी आत्महत्येच्या गंभीर विषयावर बोलत असताना स्टेजच्या बाजुला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्या. यावर बच्चू कडू यांनी मध्येच भाषण थांबवित टाळ्या वाजविणाऱ्या कार्यकर्त्यांवर चांगलेच भडकले. टाळ्या वाजवितो नालायक मारू थोबाडीत एक असे कडू यांनी बजाविताच सभास्थळी काही क्षण गंभीर वातावरण निर्माण झाले होते.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे शुक्रवारी (दि.५) शेतकरी हक्क यात्रेसाठी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी आमगाव तालुक्यातील ठाणा येथे शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान बच्चू कडू परभणी येथील सचिन जाधव या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या अत्यंत संवेदनशिल विषयावर भाष्य करीत होते. हे भाष्य करीत असताना स्टेजच्या बाजुला बसलेल्या कार्यकर्त्याने टाळ्या वाजविल्या. यावर बच्चू कडू यांनी हा काय टाळ्या वाजविण्याचा विषय आहे काय असे बजावित कार्यकर्त्याला स्टेजवरुनच चांगले खडसावले. या सभेत बच्चू कडू यांनी सरकारवर तोफ डागली. सरकार शेतमालाला

हमीभाव देत नाही, बोनस व चुकाऱ्याचे पैसे वेळेवर शेतकऱ्यांना देत नाहीत. हे राज्यातील महायुती सरकार हे शेतकरी हितेशी नसल्याचा आरोप केला. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अशा सरकारला आता शेतकऱ्यांनीच धडा शिकावावा असे सांगितले.
 

२८ सप्टेंबरला मोठे आंदोलन करणार

राज्यातील महायुती सरकार दिव्यांगाच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. मात्र आपण दिव्यांग बांधवांवर अन्याय होवू देणार नाही. दिव्यांगांच्या विविध प्रश्नांसाठी २८ सप्टेंबरला मोठे आंदोलन करण्याचा इशारा माजी आ. बच्चू कडू यांनी दिला.

त्या प्रश्नावर बच्चू कडू चिडले

माजी आ. बच्चू कडू यांना माध्यम प्रतिनिधींनी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष असताना दिव्यांगांचे प्रश्न का सोडविले नाही असा प्रश्न केला असता या प्रश्नावर बच्चू कडू चांगलेच चिडले. पुढे सावरत त्यांनी मी एकटाच आमदार हा प्रश्न लावूृन धरणारा होतो. त्यामुळे
माझ्या एकट्याच्या मनासारख कस होणार असे ते म्हणाले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रgondiya-acगोंदिया