शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अजाज अत्याचार प्रतिबंध कायद्यावर रंगणार कार्यशाळा

By admin | Updated: February 23, 2015 02:04 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सकाळी १०.३० वाजता ..

गोंदिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यावतीने २५ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सकाळी १०.३० वाजता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता राज्याचे समाजकल्याण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडाले कार्यशाळेचे उद्घाटन करतील. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा पोलिस अधीक्षक शशीकुमार मीना, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे निबंधक व प्रकल्प संचालक राजेंद्र मुठे, समाजकल्याण सहायक आयुक्त सुरेश पेंदाम, प्रकल्प अधिकारी व कार्यशाळा समन्वयक मनोज खंडारे उपस्थित राहणार आहे.कार्यशाळेत प्रसिद्ध विचारवंत व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुण्याच्या महात्मा फुले अध्यासन केंद्राचे विभागप्रमुख हरी नरके हे महाराष्ट्रातील जातीप्रथा, समस्या आणि सामाजिक वास्तव या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९७९ मधील तरतूदी व विश्लेषण आणि मानवी हक्क अंमलबजावणी व प्रशासनाची भूमिका या विषयावर अ‍ॅड. विनोदकुमार गजभिये, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ या कायद्याची आवश्यकता व त्याची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर अ‍ॅड. राजेंद्र पांडे आणि सेवानिवृत्त अपर पोलीस महासंचालक अशोक धीवरे हे मार्गदर्शन करणार आहे.कार्यशाळेला जिल्ह्यातील सामाजिक न्याय क्षेतात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, विधी आणि समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तिंना प्रशिक्षणार्थी म्हणून आमंत्रित केले आहे. अधिक संख्येत नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे. (तालुका प्रतिनिधी)