शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

भूराटोलाच्या महिलांनी केला दारूचा अड्डा उद्ध्वस्त

By admin | Updated: January 8, 2015 22:56 IST

तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी ग्रामपंचायत भूराटोला येथे दारूबंदी महिला मंडळ आणि नवयुवक मंडळ, तंटामुक्त समितीच्या कार्यकर्ते यांनी १६ पोती मोहफुल गोळे

परसवाडा : तिरोडा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या पालडोंगरी ग्रामपंचायत भूराटोला येथे दारूबंदी महिला मंडळ आणि नवयुवक मंडळ, तंटामुक्त समितीच्या कार्यकर्ते यांनी १६ पोती मोहफुल गोळे उद्ध्वस्त केले व २० लिटर दारू, एक ड्रम, १ क्विंटल मोहफुल, साहित्य जप्त करून तिरोडा पोलिसांच्या स्वाधीन केले. पालडोंगरी, भुराटोला येथे महिला दारूबंदी समिती गठित करण्यात आली. पंधरा दिवसाअगोरदरच सर्व दोन्ही गावातील दारू विक्रेते गाळणारे यांना नोटीस लेखी व तोंडी ही सभेत सांगण्यात आले होते. भूराटोटला येथील निरंजन बळीराम मालाधरे यांच्या घराच्या मागे असलेल्या स्वत:च्या शेतात १६ पोती मोहफुल गोळे, दारू गाळण्याचे साहित्य, तनसीच्या ढिगाऱ्यात आढळले व लालचंद देवगडे यांच्या घरी २० लिटर मोहफुल दारू आढळली. निरंजन भालाधरे हा दारूचा व्यवसाय करीत असतो. पण त्याने गोळे आपले नसल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचनामा करुन लावारिश असल्याचे सांगितले. लालचंद देवगडे फरार असून त्याच्यावर दारुबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दारुबंदी समिती अध्यक्ष सुधा घरजारे, सागन पटले यांना जाणीव होताच त्यांनी सर्व महिला मंडळाच्या सदस्य व नवयुवक वर्ग, तंटामुक्त स मिती पदाधिकारी यांना घेवून भुराटोला येथे जाऊन घटनास्थळी दारुच्या अड्डावर गेले. पोलिसांना फोनद्वारे संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले व पंचनामा करुन सर्व साहित्य पोलिस गाडीत टाकून पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले. हवालदार जी.डी. करंजेकर, विजय लाखे, आरोपी शोध घेत असून तपास करीत. दारू पकडण्यासाठी सौ. सोमलता गौतम, अनिता गौतम, धनवंता भंडारी, सुधा रहांगडाले, जैयवंता राऊत, करुणा पंधरे, नान्ही पंधरे, सुखचंद रहांगडाले, कांचन पटले, तं.मु.अध्यक्ष गणराज रहांगडाले, रेखलाल रहांगडाले, दिलीप रहांगडाले, गजानन बावणे, लकेश नंदेश्वर, किशोर लांजेवार, मधु लांजेवार, सोमेश्वर रहांगडाले, पवन पटले, चंद्रभान साबळे यांनी विशेष सहकार्य केले. (वार्ताहर)