क्षुल्लक भांडणातून पत्नीला केले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST2019-12-30T06:00:00+5:302019-12-30T06:00:14+5:30

शनिवारी (दि.२८) गावात मंडई असल्याने दिवसभर चौकाचौकांत खेळ दाखवून आलेल्या पैशांतून रूपचंदने सायकांळी दारू प्राशन केली. क्षुल्लक कारणातून रूपचंद व मंगला यांच्यात भांडण झाल्याचे सांगीतले जात असून रागाच्या भरात रूपचंदने मंगलाच्या डोक्यावर काठीने मारले. डोक्यावर जबर मार लागल्याने मंगला जागीच ठार झाली.

Wife killed by minor quarrel | क्षुल्लक भांडणातून पत्नीला केले ठार

क्षुल्लक भांडणातून पत्नीला केले ठार

ठळक मुद्देबाजारवाडीतील घटना : दारूच्या नशेत डोक्यावर काठीने मारले

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात दारूड्याने पत्नीच्या कोड्यावर काठीने मारून तिला ठार केले. येथील बाजारवाडीत शनिवारी (दि.२८) रात्री १० वाजतादरम्यान ही घटना घडली. मृत महिलेचे नाव मंगला रूपचंद राऊत (३०) असे आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी रूपचंद राऊत (३५,रा.झरपडा) हा पत्नी मंगला, दोन मुली व एका मुलासोबत बाजारवाडीत राहत होता. गोपाळाचा खेळ दाखवून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी (दि.२८) गावात मंडई असल्याने दिवसभर चौकाचौकांत खेळ दाखवून आलेल्या पैशांतून रूपचंदने सायकांळी दारू प्राशन केली. क्षुल्लक कारणातून रूपचंद व मंगला यांच्यात भांडण झाल्याचे सांगीतले जात असून रागाच्या भरात रूपचंदने मंगलाच्या डोक्यावर काठीने मारले. डोक्यावर जबर मार लागल्याने मंगला जागीच ठार झाली.
रविवारी (दि.२९) सकाळी लोकांना याबाबत माहिती होताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी रूपचंदला ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रकरण नोंद केले असून तपास ठाणेदार दिपक जाधव करीत आहेत.

Web Title: Wife killed by minor quarrel

टॅग्स :Murderखून